चंद्रावर स्पेसएक्सच्या रॉकेटची धडक


फाल्कन-९ मोहिमेचा रॉकेट भाग चंद्रावर आदळला; अवकाशातील वाढत्या कचऱ्याबाबत पुन्हा चिंता व्यक्त

फ्लोरीडा: 

उपसंपादक : श्री. स्वप्निल कुंभार. 

उद्योगपती इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीचे वापरात नसलेले रॉकेट चंद्राच्या पृष्ठभागावर आदळल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे ४,००० किलो वजनाचे आणि जवळपास १०० फूट लांबीचे हे रॉकेट ताशी अंदाजे ८,६९० किमी वेगाने चंद्रावर धडकले. या घटनेमुळे पृथ्वीला कोणताही धोका नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

रॉकेटचा हा भाग स्पेसएक्सच्या फाल्कन-९ मोहिमेतील असून, त्याद्वारे अमेरिकेची तसेच जपानची दोन अंतराळ याने अवकाशात पाठविण्यात आली होती. मोहिम पूर्ण झाल्यानंतर हा भाग पृथ्वी, चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे कक्षेबाहेर जाऊन अवकाशात भटकत राहिला.

अंतराळशास्त्रज्ञांनी त्याच्या हालचालींचा अभ्यास केल्यानंतर तो चंद्राच्या दिशेने सरकत असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. अखेर अपेक्षेप्रमाणे हे रॉकेट चंद्रावर कोसळल्याची पुष्टी झाली आहे.

विशेष म्हणजे, जानेवारी २०२५ मध्ये फ्लोरिडातून प्रक्षेपित झाल्यानंतर सुमारे १८ महिन्यांनी ही घटना घडली. चंद्रावर वातावरण नसल्याने या धडकेमुळे निर्माण झालेला खड्डा किंवा इतर परिणाम दीर्घकाळ कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

आजपर्यंत चंद्रावर विविध देशांच्या मोहिमांमधून जवळपास ३,००० हून अधिक अवशेष साचले आहेत. त्यामध्ये १९६९ मध्ये सोव्हिएत संघाच्या लुना-२ यानापासून ते आतापर्यंतच्या अनेक मोहिमांतील उपकरणांचा समावेश आहे. सध्या या अवशेषांमुळे कोणताही तातडीचा धोका नसला, तरी भविष्यात वाढत्या अंतराळ मोहिमांमुळे चंद्रावरील ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण आणि अवकाशातील कचऱ्याचे व्यवस्थापन हे मोठे आव्हान ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

 


2
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!