
रेशन कार्डधारकांसाठी मोठा बदल: CBDC रेशन कूपनद्वारे डिजिटल चलन आणि QR कोडवरून तांदूळ खरेदीची सोय
राजू कुंभार: नागुर्डा
रेशन वितरण व्यवस्थेत आता डिजिटल क्रांतीचे नवे पाऊल पडत आहे. CBDC रेशन कूपन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या मोबाईल वॉलेटमध्ये थेट डिजिटल रुपये जमा केले जाणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात ५ किलो तांदळासाठी (प्रति किलो ₹४०-४५ दराप्रमाणे अंदाजे ₹२२५ च्या रकमेचा उल्लेख) कूपन मिळणार असून, या कूपनची वैधता ३ ते ६ महिने इतकी असेल. पहिल्या टप्प्यात ही नाविन्यपूर्ण सुविधा बंगळुरू येथे सुरू केली जाणार आहे.
या नव्या सुविधेचे ठळक फायदे:
सोपी प्रक्रिया: POS मशीनवर QR कोड स्कॅन करून व्यवहार पूर्ण करता येईल; शिवाय कीपॅड फोन वापरणाऱ्यांसाठी SMS OTP ची खास सोय करण्यात आली आहे.
हव्या तेवढ्या खरेदीची मुभा: नागरिकांना गरजेनुसार आणि हवा तेवढाच धान्यसाठा खरेदी करता येणार आहे.
पारदर्शकता आणि दुरुपयोगाला आळा: वजनातील फसवणूक, काळा बाजार, तांदळाचा अपव्यय आणि बनावट रेशन चिठ्ठ्यांवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवणे शक्य होईल.
तांत्रिक अडचणींपासून सुटका: बायोमेट्रिक आणि सर्व्हरच्या तांत्रिक समस्यांवर यामुळे मात करता येईल.
कुठेही, कधीही रेशन: देशभरात कोणत्याही ठिकाणी रेशन घेण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
जनतेची आणि दुकानदारांची मागणी काय?
रेशन वाटपाच्या संदर्भात नागरिकांकडून २ किलो तांदळासोबत ३ किलो गहू देण्याची मागणी जोर धरत आहे. दुसरीकडे, रेशन दुकानांचे कमिशन ₹१५० वरून ₹२५० पर्यंत वाढवण्यात यावे, अशी मागणीही पुढेयेत आहे.
Advertise


