मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील कन्येच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

गडहिंग्लज | प्रतिनिधी: श्री. स्वप्निल कुंभार.
मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील सानिका चंद्रकांत माने हिची चीन येथे होणाऱ्या आशिया चषक ज्युनियर महिला हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. सध्या ती नूल येथील इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूल, टेक्निकल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी व उत्कृष्ट हॉकीपटू आहे.
सानिकाच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे मुगळी गावासह संपूर्ण गडहिंग्लज तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या निवडीबद्दल क्रीडा क्षेत्र, शैक्षणिक संस्था, ग्रामस्थ तसेच विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Views: 48



