मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर सीमावासीय मांडणार व्यथा; कार्यकर्त्यांनी सांबरा विमानतळावर जमावे : म. ए. समितीचे आवाहन


मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर सीमावासीय मांडणार व्यथा; कार्यकर्त्यांनी सांबरा विमानतळावर जमावे : म. ए. समितीचे आवाहन

खानापूर (प्रतिनिधी) :

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या, शनिवार (दि. २८ नोव्हेंबर) बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण समितीचे (म. ए. समिती) शिष्टमंडळ त्यांची भेट घेऊन सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रलंबित समस्या आणि व्यथा त्यांच्यासमोर मांडणार आहे.

नुकतेच १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवनियुक्त अध्यक्षपदी निवड झालेले डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात तसेच सीमाभागातील मराठी भाषिकांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सीमाभागातील मराठी जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. या गंभीर विषयावरही समितीच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तीव्र शब्दांत आवाज उठवला जाणार असून, यासंदर्भात सविस्तर निवेदन दिले जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर, आपली एकजूट दाखवण्यासाठी आणि सीमाप्रश्नी आवाज बुलंद करण्यासाठी खानापूर तालुक्यातील तमाम महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी उद्या 3 वाजता सांबरा विमानतळाजवळ मोठ्या संख्येने जमावे, असे जाहीर आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!