कर्नाटक आरक्षण वर्गवारी ,तुमची जात कोणत्या प्रवर्गात मोडते?


कर्नाटक आरक्षण वर्गवारी ,तुमची जात कोणत्या प्रवर्गात मोडते? जाणून घ्या ‘अ’ आणि ‘ब’ वर्गाचे सविस्तर गणित!

राजू कुंभार /खानापूर 

ग्राम पंचायत, तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणूक आरक्षण जाहीर झाले. राज्य निवडणूक आयोग,कर्नाटक पंचायत राज (election procedure) नियम १९९३ च्या नियम २ (८(ए)) नुसार:ग्रामपंचायत निवडणुकीची निवडणूक लढवणारा उमेदवार ज्या तालुक्याच्या क्षेत्रामध्ये येतो, त्याच तालुक्याचे तहसीलदार उमेदवाराच्या जातीची पडताळणी करून जात प्रमाणपत्र देण्यास सक्षम प्राधिकारी असतात. कर्नाटक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय (आरक्षक नेमणूक इ.) अधिनियम, १९९९ मधील नियमांनुसार जात प्रमाणपत्र निवडणुकीच्या उद्देशासाठी ग्राह्य धरले जाते. आरक्षण बाबत सविस्तर माहिती ग्रामदूत प्रसारित करीत आहे. अधिक माहितीसाठी तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.

अनुसूचित जाती ಪರಿಶಿಷ್ಟ ಜಾತಿ /(SC) 

• आदी कर्नाटक

• आदी द्रविड

• आदी आंध्र

• भोवी / वड्डर

• बंजारा / लमाणी / लम्बानी

• मादिगा

• होलया / होलेर

• चर्मकार गट

SC मध्ये तीन प्रकार आहेत 

१. गट-अ

• मादिगा,

• मातंगी,

• चक्किलिय,

• डक्कल / डक्कलिंगा

• मिथा अय्यलवार

• सिंधोळ्ळू / चिंधोळ्ळू

२. गट-ब 

या गटामध्ये प्रामुख्याने खालील समुदायांचा समावेश होतो:

• होलया

• होलेर

• हरिजन

• भंगी / मेहतर / बाल्मिकी

• चांभार / चर्मकार / मोची

३. गट-क

• भोवी

• बंजारा / लम्बानी / सगाली

• कोराचा

• कोरामा

• बेडा जंगम / बुडगा जंगम

• हंडी, जोगी

अनुसूचित जमाती ಪರಿಶಿಷ್ಟ ಪಂಗಡ ST

सिद्दी,नाईकडा, नायका, कोळी ढोर, चोलीवाला नायका, कपाडिया नायका, मोटा नायका, नाना नायका, नाईक, नायक, बेडा, बेदार आणि वाल्मिकी (यात ‘परिवारा’ आणि ‘तलवारा’ समाविष्ट आहेत)

नायक / वाल्मिकी ( नायक, नाईकपोड, राजगोंड आणि पालळेगार या पोटजातींचाही समावेश होतो.)

• परिवारा आणि तलवारा

• जेनू कुरुबा

• कोरागा

• हक्की पिक्की

• सोलिगा

• सिद्दी

• काडू कुरुबा / बेट्टा कुरुबा

• येरवा

• गोंड

• भिल्ल

• कोंढाप्पा

• कोळी ढोर / टोकरे कोळी

• मेदार

अ वर्ग, ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗ ಅ 2A (OBC)

व्यावसायिक मागास जाती (उदा. कुरुबा, इडिगा, देवडिगा, कुंभार,अगासा, विश्वकर्मा).

कर्नाटकातील अत्यंत मागास आणि पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या जातींचा गट आहे. यात तीन वर्ग आहेत

१. प्रवर्ग Category 1A

• गवळी , अडवी गोल्ला

• जोगी, नाथपंथी / डौरी गोसावी

• भटराज

• बैरागी

• बुडबुडकी / गोंधळी

• घिसाडी

• काशि कापडी

• कुडुबी

• वडारी- काही उपजाती)

• हेळव

 

२. प्रवर्ग २-ए (Category 2A) 

मडीवाळ / धोबी परीट किंवा धोबी समाज.

• कुंभार

• कुरुबा

• इडिगा

• देवाडिगा

• दर्जी / शिंपी

• नयिंदा: न्हावी

• विश्वकर्मा,सुतार, लोहार, सोनार आणि तांबट समाज.

• तिगळा

• उप्पर

• गाबीत मच्छीमार समुदाय.

 

Category 3A 

वक्कलिगा

• वोकलीगा

• कोडवा कूर्ग (कोडागु)

• बंट, किनारपट्टी (उडुपी, दक्षिण कन्नड)

• हेगडे

ब वर्ग, ಹಿಂದುಳಿದ B ವರ್ಗ,

2Bमुस्लिम समुदाय (धार्मिक अल्पसंख्याक).

• मुस्लिम

• पिंजार / नदाफ

• कसाई / कुरेशी

• लब्बै

• मापिळ्ळा

Category 3B

• लिंगायत / वीरशैव , डिक्षित, शीलवंत, बनजीग, पंचमसाली

• मराठा

• ख्रिश्चन (Christian): अनुसूचित जातींमधून धर्मांतरित नसलेले इतर ख्रिश्चन

• जैन – दिगंबर आणि श्वेतांबर

Advertise

 


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!