२७ ऑक्टोबरपासून भव्य जंगी बैलगाडी शर्यतीचा धुरळा


२७ ऑक्टोबरपासून भव्य जंगी बैलगाडी शर्यतीचा धुरळा

जय जवान जय किसान मंडळाकडून आयोजन ;आमदारांच्या हस्ते होणार उद्घाटन

खानापूर: राजू कुंभार 

खास दसरा व दीपावलीच्या निमित्ताने शांतिनिकेतन पब्लिक स्कूल च्या पाठीमागे कुप्पटगिरी रोड, खानापूर येथे ‘जय जवान जय किसान’ यांच्या सौजन्याने एका बैलगाडीची (गाडा) चाके न बांधता बैलजोडीने ओढण्याची ‘भव्य जंगी बैलगाडी शर्यत’ आयोजित करण्यात आली आहे. ही थरारक स्पर्धा २७ ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत रंगणार असून मंगळवार दि. २७ रोजी सकाळी ठीक १० वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

शर्यतीचे उद्घाटन आमदार श्री. विठ्ठल सोमान्ना हलगेकर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्ष स्थानी श्री. सदानंद परशुराम होसुरकर (भाजपा उपाध्यक्ष व शर्यत संघटना अध्यक्ष)हे राहणार आहेत. कार्यक्रमाला संस्थापक: हॉ. सुभेदार मेजर श्री. हणमंत मल्लारी गुरव (एक्स आर्मी, गणेबैल) माजी आमदार श्री. अरविंद पाटील, श्री. प्रमोद कोचेरी, माजी आमदार श्री. दिगंबर पाटील, कॅप्टन पांडुरंग मलगे, श्री. विलास बेळगांवकर, श्री. सदानंद पाटील, सौ. धनश्री सरदेसाई, श्री. पांडुरंग मेलगे, श्री. प्रमोद कदम, श्री. झेड् नाईक, श्री. बसवराज सानिकोप, श्री. अमृत शेलार, श्री. सुरेश सुळकर यांसह प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तसेच विविध संघ संस्थांचे अध्यक्ष पदाधिकारी, राजकीय नेते, माजी सैनिक संघटना उपस्थित राहणार आहेत. यावेळी गुणवंतांचा सत्कार होणार आहे . संपूर्ण शर्यतीचे समालोचन श्री. एकनाथ कांबळे (सरपंच हलकर्णी) हे करणार आहेत. संपूर्ण शर्यत सेन्सर वर चालणार आहे.14 प्रकाराच्या नियम व अटी घालण्यात आलेल्या आहेत. अधिक माहितीसाठी मंडळाशी संपर्क साधावा.

गटनिहाय बक्षिसांचा तपशील

मोठा गट (प्रवेश फी: ₹४,०००/-)

पहिले बक्षीस: Hf100 BIKE दुचाकी (मंडळाकडून)

दुसरे बक्षीस: ₹४१,००१/- (मंडळाकडून)

तिसरे बक्षीस: ₹३१,००१/- (मंडळाकडून)

चौथे बक्षीस: ₹२१,००१/- (मंडळाकडून)

पाचवे बक्षीस: ₹१६,००१/- (मंडळाकडून)

सहावे बक्षीस: ₹१४,००१/- (मंडळाकडून)

सातवे बक्षीस: ₹१२,००१/- (श्री. लक्ष्मण बारकु बामणे, माजी झेड.पी.)

आठवे बक्षीस: ₹१०,००१/- (श्री. आप्पय्या गुरव, डेव्हलपर्स खानापूर)

नववे बक्षीस: ₹८,००१/- (श्री. विराज स्टिल व हार्डवेअर भंडरगाळी)

दहावे बक्षीस: ₹७,००१/- (श्री. लक्ष्मण झांजरे, भाजपा ज्येष्ठ नेते जांबोटी)

अकरावे बक्षीस: ₹६,००१/- (श्री. रामचंद्र कल्लाप्पा पाटील, प्र. शेतकरी भंडरगाळी)

बारावे बक्षीस: ₹५,००१/- (श्री. चांगाप्पा कृष्णा बाचोळकर, नंदगड)

तेरावे बक्षीस: ₹४,००१/- (श्री. लक्ष्मण महादेव मोरे व श्री. बबन नागेश डेळेकर, गणेबैल)

चौदावे बक्षीस: ₹३,५०१/- (मंडळाकडून)

पंधरावे बक्षीस: ₹३,१०१/- (श्री. गोविंद गणपती जाधव, इदलहोंड)

सोळावे बक्षीस: ₹२,५०१/- (श्री. विनायक प्रकाश पाटील, भंडरगाळी)

 

लहान गट (प्रवेश फी: ₹२,०००/-)

पहिले बक्षीस: ₹२१,००१/- (मंडळाकडून)

दुसरे बक्षीस: ₹१८,००१/- (मंडळाकडून)

तिसरे बक्षीस: ₹१५,००१/- (मंडळाकडून)

चौथे बक्षीस: ₹१२,००१/- (मंडळाकडून)

पाचवे बक्षीस: ₹१०,००१/- (मंडळाकडून)

सहावे बक्षीस: ₹९,००१/- (मंडळाकडून)

सातवे बक्षीस: ₹८,००१/- (मंडळाकडून)

आठवे बक्षीस: ₹७,००१/- (मंडळाकडून)

नववे बक्षीस: ₹६,००१/- (मंडळाकडून)

दहावे बक्षीस: ₹५,००१/- (श्री. महादेव भ. पार्सेकर आणि लक्ष्मण चाळगुंडे, कान्सुली)

अकरावे बक्षीस: ₹४,५०१/- (मंडळाकडून)

बारावे बक्षीस: ₹४,००१/- (मंडळाकडून)

तेरावे बक्षीस: ₹३,५०१/- (मंडळाकडून)

चौदावे बक्षीस: ₹३,००१/- (मंडळाकडून)

पंधरावे बक्षीस: ₹२,५०१/- (मंडळाकडून)

सोळावे बक्षीस: ₹२,१०१/- (श्री. रमेश बाळु पाटील, एक्स आर्मी बेकवाड)

सतरावे बक्षीस: ₹१,५०१/- (श्री. निलकंठ गं. पाटील, प्र. शेतकरी भंडरगाळी)

एकविसावे बक्षीस (लकी नंबर): ₹२,१०१/- (श्री. अजीत म. पाटील, भंडरगाळी)

तरी सर्व हौशी बैलजोडी मालकांनी आणि कुस्ती-शर्यत प्रेमींनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. संपर्क -7676014436,9108369717,9743741588

Advertise


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!