गडहिंग्लज मधील युवकांना सुवर्णसंधी 


गडहिंग्लज मधील युवकांना सुवर्णसंधी 

स्वप्निल कुंभार:(उपसंपादक- चंदगड, आजरा व गडहिंग्लज):अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, गडहिंग्लज यांच्या वतीने दिनांक: १६ ऑगस्ट रोजी शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता रांगणागड येथे अविस्मरणीय ट्रेकिंग चे आयोजन करण्यात आले आहे.

ट्रेकिंगला गडहिंग्लज येथून सुरुवात होणार असून रांगणागडावर याची समाप्ती होणार आहे. १८ ते २३ वर्षे वयोगटातील विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतील. यासाठी 399 रुपये नोंदणी शुल्क आहे .

नाष्टा, जेवण, परतीचा प्रवास, प्रथमोपचार (FIRST AID) याची सोय अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करणार आहे. या ट्रेकिंग चा अनुभव घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अधिक माहिती आणि नोंदणी साठी संपर्क: 8087921901 / 7888094142


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!