तिलारी घाटात दोन गाड्यांचे विचित्र अपघात


अपघातग्रस्तांना पाहण्यासाठी आलेल्या नातेवाईकांच्या गाडीचाही अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली.

चंदगड प्रतिनिधी श्री स्वप्निल कुंभार.

चंदगड तालुक्यातील कोदाळी मार्गे तिलारी घाटातून खाली येताना मोठ्या वळणावर टोयोटा गाडीचा अपघात झाला. घाटातून खाली जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीने रस्त्याच्या कडेला असलेले साईडचे लोखंडी रेलिंग तोडले आणि दोन ते तीन पलट्या घेत खाली जाऊन अपघातग्रस्त झाली.

टोयोटा गाडीचा अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यातील व्यक्तींचे नातेवाईक त्यांना पाहण्यासाठी घटनास्थळी येत होते. यावेळी तिलारी घाटाच्या खालील बाजूला असलेल्या तिलारी कॅनलजवळ त्यांच्या स्कोडा गाडीचाही अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कोडा गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या सिमेंटच्या ब्लॉकला धडकली v तिचाही अपघात झाला.

अशा प्रकारे एकाच घटनेच्या पार्श्वभूमीवर टोयोटा आणि त्यानंतर नातेवाईकांच्या स्कोडा अशा दोन कर्नाटक पासिंग गाड्यांचे अपघात झाले. दोन्ही अपघातांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.

एका वाहनांतील चालकानी मद्यपान केले होते, असा दावा घटनास्थळी उपस्थित काही स्थानिक नागरिकांनी केला आहे. मात्र, याबाबत अधिकृत पोलिसांकडून पुष्टी झालेली नाही.

तिलारी घाटातील तीव्र वळणे, उतार आणि अरुंद रस्ता लक्षात घेता वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून अत्यंत सावधगिरीने वाहन चालवावे, असे आवाहन स्थानिक नागरिकांनी केले आहे.


107
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!