गायरान लाटल्याने गोमाता रस्त्यावर


गायरान लाटल्याने गोमाता रस्त्यावर

तथाकथित हिंदुत्ववादी अन् भाजप नेते कोमात!

खानापूर (वार्ताहर)

“तालुक्यात गोमातेसाठी चरायला आणि थांबायला जागाच शिल्लक राहिलेली नाही. गायरान जमिनी लाटल्या गेल्यामुळे आज गोमाता रस्त्यावर बसत आहेत परिणामी अपघातांचे प्रमाण वाढत आहे. दुर्दैव म्हणजे दिवस-रात्र गोमातेचे गुणगान गाणारे तथाकथित हिंदुत्ववादी आणि भाजपचे नेते या विषयावर आता पूर्णपणे कोमात गेले आहेत,” असा घणाघाती प्रहार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केला.

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्या पुढे म्हणाल्या, “खानापूर तालुक्यातील गायरान जमिनी लाटणाऱ्यांना सर्व प्रशासकीय अधिकारी उघडपणे सहकार्य करत आहेत. गायरान जमिनी लुटणारे मजेत फिरत आहेत आणि ज्या गोमातेच्या नावावर मते मागितली जातात, ती गोमाता आज रस्त्यावर उन्हा-तान्हात बसून अपघातांना बळी पडत आहे. गोमातेच्या या विदारक स्थितीवर आज खुद्द शंकराचार्यांनीही केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मग खानापुरातील भाजप नेत्यांना आणि समर्थकांना याचे काहीच वाटत नाही का?”

रस्त्यांवर भटकणाऱ्या आणि अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या या गुरांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी किंवा गोशाळेत हलवण्यात यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.

Advt

 


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!