10वी,12वी तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी


10वी,12वी तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी

वर्षा कुंभार: खानापूर
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इंडिया पोस्ट (टपाल विभाग) आणि कर्मचारी निवड आयोग (SSC) यांच्यामार्फत तब्बल २६,००० हून अधिक विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यात १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी कोणतीही लेखी परीक्षा न होता थेट गुणांच्या आधारे निवडीची संधी आहे, तर १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये अधिकारी आणि लिपिक पदांवर नियुक्ती मिळवण्याची संधी आहे.

इंडिया पोस्ट GDS भरती
इंडिया पोस्टकडून ग्रामीण डाक सेवक (GDS) अंतर्गत ब्रांच पोस्टमास्तर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्टमास्तर (ABPM) आणि डाक सेवक या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.
एकूण पदे: २३,७५७
निवड प्रक्रिया: कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत नाही. इयत्ता १०वीच्या गुणांच्या आधारे स्वयंचलित गुणवत्ता यादी (Merit List) तयार करून निवड केली जाईल.
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त मंडळातून १०वी उत्तीर्ण (गणित व इंग्रजी विषयासह). उमेदवाराला स्थानिक भाषेचे ज्ञान, मूलभूत संगणक ज्ञान आणि सायकल चालवता येणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा: १८ ते ४० वर्षे (नियमानुसार SC/ST – ५ वर्षे, OBC – ३ वर्षे, PwBD – १५ वर्षे सवलत).
अर्जाची अंतिम तारीख: २१ सप्टेंबर २०२६
अधिकृत संकेतस्थळ: India Post GDS Online Engagement Portal अथवा खानापूर येथिल सुपरनेट डिजिटल सर्व्हिस सायबर कॅफेला भेट द्या.

SSC CHSL भरती
कर्मचारी निवड आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये Lower Division Clerk (LDC), Junior Secretariat Assistant (JSA) आणि Data Entry Operator (DEO) पदांसाठी परीक्षा जाहीर झाली आहे.
* एकूण पदे: २,५३६
* निवड प्रक्रिया: कॉम्प्युटर आधारित वस्तुनिष्ठ परीक्षा (Tier-I), त्यानंतर वस्तुनिष्ठ परीक्षा, कॉम्प्युटर ज्ञान व टायपिंग/स्किल टेस्ट (Tier-II).
* शैक्षणिक पात्रता: १२वी (१०+२) उत्तीर्ण. (काही विशेष DEO पदांसाठी १२वी सायन्स शाखेतून गणित विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक).
* वयोमर्यादा: १८ ते २७ वर्षे (१ ऑगस्ट २०२६ रोजी), राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयात सूट.
* अर्ज शुल्क: ₹१०० (General/OBC/EWS पुरुष). महिला, SC, ST, दिव्यांग व माजी सैनिकांसाठी कोणतीही फी नाही.
* अर्जाची मुदत: ७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर २०२६
* अधिकृत संकेतस्थळ: ssc.gov.inअथवा खानापूर येथिल सुपरनेट डिजिटल सर्व्हिस सायबर कॅफेला भेट द्या.
टीप: दोन्ही भरती प्रक्रियांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन जाहिरात काळजीपूर्वक वाचून मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज करावेत.


107
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!