गडहिंग्लज तालुका शिक्षक संघाचे पुरस्कार जाहीर 


मुख्याध्यापक महेश कुंभार

गडहिंग्लज तालुका शिक्षक संघाचे पुरस्कार जाहीर 

गडहिंग्लज: स्वप्नील कुंभार

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा गडहिंग्लज यांच्या वतीने ५ सप्टेंबर ‘शिक्षक दिना’चे औचित्य साधून तालुक्यातील विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा व शाळांचा यात गौरव करण्यात येणार आहे. विद्या मंदिर,नौकुड चे मुख्याध्यापक महेश कुंभार(रा. दड्डी) यांना यंदाचा शिक्षक संघरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

संघटनेचे अध्यक्ष अनिल बागडी यांनी पुरस्कारार्थींची यादी प्रसिद्ध केली आहे. घोषित करण्यात आलेले पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत:

पुरस्कारार्थींची यादी

सेवागौरव पुरस्कार:अनिल हळिंगळे (विद्या मंदिर अरळगुंडी), जयश्री जांभळे (विद्या मंदिर पीएम श्री विद्यालय, जरळी)

 पी. सी. पाटील गुरुजी शिक्षणमंच कार्यकर्ता पुरस्कार: वैशाली कोष्टी (विद्या मंदिर वडरगे)

आदर्श शिक्षक पुरस्कार:भरत शेळके (विद्या मंदिर ऐनापूर)

आदर्श शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुरस्कार:मिनाक्षी शिंगटे (पीएम श्री बॅ. नाथ पै विद्यालय, गडहिंग्लज), निलेश पोवार (विद्या मंदिर सावतवाडी तर्फ नेसरी)

आदर्श शाळा पुरस्कार:विद्या मंदिर हिरलगे, विद्या मंदिर गांधीनगर हलकर्णी

शिक्षक संघरत्न पुरस्कार: महेश कुंभार (विद्या मंदिर नौकुड), संदीप बाबर (विद्या मंदिर हरळी खुर्द), सपना पाथरवट (विद्या मंदिर बसर्गेरस्ता, खणदाळ)

पुरस्कार घोषित झालेल्या सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शाळांचे शिक्षक संघाचे नेते मधुकर येसणे, डी. एस. खामकर, सुभाष निकम, सरचिटणीस अय्याज बागवान,शिक्षक बँक संचालक नंदकुमार वाईंगडे, कार्याध्यक्ष काशिनाथ साखरे व विजयकुमार शिंदे, कोषाध्यक्ष अनिल गोणी, प्रसिद्धी प्रमुख सुनील कांबळे व रमेश कोनूरी यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्यांनी अभिनंदन केले आहे.


112
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!