भात शिळा वाढल्याच्या वादातून मुलाची आईला मारहाण; आजरा पोलिसांत तक्रार दाखल


होळळाळी येथील घटना; मुलगा संदीप चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा नोंद.

 आजरा प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.

जेवणावरून झालेल्या किरकोळ वादातून मुलाने स्वतःच्या आईला शिवीगाळ करत भाताच्या पळी व पतील्याने, काठीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना आजरा तालुक्यातील होळळाळी येथे घडली आहे. याप्रकरणी शांताबाई गुंड चव्हाण (वय ६५, रा. होळळाळी, ता. आजरा) यांनी आजरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  

​पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी मुलगा संदीप गुंड चव्हाण हा आईच्या घरी येऊन जेवण करत असे. घटनेच्या वेळी जेवताना “मला भात गरम का केला नाही, थंड का वाढला?” असा जाब विचारत त्याने आईला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने त्याने संतापाच्या भरात भाताचे भांडे (पतील ), काठी आणि लाथाबुक्क्यांनी आईला मारहाण केली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून आजरा पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!