आडी दत्त देवस्थानाकडून  खानापूरच्या शिक्षिकेचा सन्मान


आडी दत्त देवस्थानाकडून  खानापूरच्या शिक्षिकेचा सन्मान

खानापूर: वर्षा कुंभार: खानापूर तालुक्यातील  दळणवळणाची अत्यंत कठीण परिस्थिती असलेल्या भीमगड परिसरातील हेम्माडगा आणि सध्या मोरब येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेत अनेक वर्षे निष्ठेने आणि कर्तव्यतत्परतेने ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षिकेला.श्री दत्त देवस्थान मठ, श्री क्षेत्र आडी, ता. निपाणी यांच्या वतीने २०२६-२७ चा ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’जाहीर झाला आहे.

Tr.रूपा कृष्णा देसाई (Tr. रूपा यशवंत पाटील) या सध्या मोरब येथे कार्यरत आहेत. एक महिला म्हणून कोणत्याही अडचणीला न डगमगता त्यांनी दुर्गम भागात शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील, प्रेमळ, कर्तव्यनिष्ठ आणि उपक्रमशील शिक्षिका म्हणून Tr. रूपा पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे.

या पुरस्काराबद्दल जांबोटी-वडगाव परिवार आणि शिक्षकवृंद, S.D.M.C. कमिटी, मोरब यांच्यावतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Advertise….


102
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!