पाटणे फाट्यावर संशयास्पद वावरणारा एकजण ताब्यात


पाटणे फाट्यावर संशयास्पद वावरणारा एकजण ताब्यात

दुसरा फरार; पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला 

स्वप्निल कुंभार:(उपसंपादक- चंदगड, आजरा व गडहिंग्लज)

पाटणे फाटा येथे शुक्रवारी दि.14 रोजी मध्यरात्री स्कॉर्पिओ गाडीत बसून चोरीच्या उद्देशाने अलेल्या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली. यात एकजण फरार झाला तर एकास पोलिसांनी ताब्यात घेतले.

घडलेली अधिक माहिती अशी, शुक्रवारी मध्यरात्री चंदगड पोलीस रात्र गस्तीला गेले होते. दरम्यान पाटणे फाटा येथे सिल्वर रंगाची स्कॉर्पिओ गाडी (KA 03 ME2119) रस्त्यालगत थांबलेली आढळून आली. यात अमित बाहुबली पचोंदी(वय 25) व प्रसाद शंकर पूनाजी दोघेही राहणार हलगा तालुका जिल्हा बेळगांव हे चोरीच्या उद्देशाने लपून बसलेले आढळून आले. दरम्यान यातील संशयित आरोपी अमित याच्याशी पोलीस चौकशी करत असताना अंधाराचा फायदा घेऊन दुसरा संशयित आरोपी प्रसाद स्कॉर्पिओ सह पळून गेला. या घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पुढील तपास सुरु आहे.


106
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!