मध्यापान करून हुल्लडबाजी,वाहन चालवीने पडले महागात ; सहा जणांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल

उपसंपादक:श्री. स्वप्निल कुंभार (चंदगड, आजरा, गडहिंग्लज)
सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना मद्यप्राशन करून पोलिसांच्या कर्तव्यात अडथळा आणल्याप्रकरणी बेळगांव तालुक्यातील सहा जणांविरुद्ध चंदगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई १५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास तिलारी येथील हॉटेल ग्रीन व्हॅलीजवळ झाली .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल भोमाणी शहापूरकर (वय २६), यल्लाप्पा कृष्णा मुदगीकर (वय २८) रा -हंगरगा ता/जि – बेळगांव, चेतन सुरेश जनगोंडा (वय २७), सुमित कोमल जनगोंडा (वय २४) दोघेही रा-अलारवाड ता /जि -बेळगाव , शिवनायक फकीर अप्पानायक (वय ४७) रा -सह्याद्री कॉलनी, उद्यमबाग, बेळगाव, व सुनील बी. चळवटेकर रा -तिरमुरी ता /जि -बेळगाव, वरील सर्वजण सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर विनापरवाना मद्यप्राशन करताना आढळून आले.
चंदगड पोलिस त्यांना चंदगड पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना आरोपींपैकी एकाने मोठ्याने आरडाओरड करून पोलिसांच्या कारवाईला विरोध केला व कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांना अडथळा आणल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर आरोपींनी मारुती सुझुकी कंपनीच्या व्हॅगेनर (MH-03 EF 5312) या कारमधून तेथून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून पाटणे फाटा येथे त्यांना अडवले.

यावेळी आरोपी क्रमांक एक याने मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत वाहन चालविल्याचे आढळून आल्याने त्याची तपासणी करण्यात आली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बाळकृष्ण त्रिंबक कोळी यांनी चंदगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ७५(अ), BNS २२१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास चंदगड पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस करीत आहेत.




