रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा जागर


चंद्रसेन गणेशोत्सव मंडळाच्या शिबिरात ७५ रक्तदात्यांचा सहभाग

उपसंपादक:श्री. स्वप्निल कुंभार.(चंदगड, आजरा, गडहिंग्लज)

श्री चंद्रसेन गणेशोत्सव मंडळ, बाजारपेठ चंदगड यांच्यावतीने गेल्या २२ वर्षांपासून स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यंदाचे शिबिर १५ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडले. मंडळाच्या ७१ व्या वर्षात पदार्पणानिमित्त आयोजित या २२ व्या रक्तदान शिबिरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष सुनील काणेकर, उपनगराध्यक्षा आयेशा नाईकवाडी, उद्योजक दयानंद काणेकर व सचिन बल्लाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी चंदगड नगरपंचायत चे नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.

गडहिंग्लज येथील लायन्स ब्लड बँकेच्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले. या कार्यात डॉ. डी. एम. गुरव, अनिल आडावकर तसेच नर्सिंग स्टाफचे सहकार्य लाभले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास मंडळाच्या वतीने भेटवस्तू म्हणून कॉलेज बॅग देण्यात आली.

यावेळी नामदेवराव मांगले, भास्करराव मांगले, बाबुराव रामा हळदणकर तसेच मंडळाचे अध्यक्ष शिवकुमार वाली, उपाध्यक्ष निलेश वाटंगी यांच्यासह संजय ढेरे, प्रवीण वाटंगी, तुकाराम गावडे, मनोहर गडकरी, पिंटू मंडलिक, गजानन पिळणकर, हिरामणी हुंबरवाडी, अमित पाटील, नितीन नेसरीकर, मोहन डोणकर, रमेश देसाई, नारायण चौगुले, अनिल औंधकर, स्वप्निल कुंभार, जयवंत तेलंग, अमोल हुंबरवाडी, हिरामणी हुंबरवाडी व मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते.

२२ वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमातून मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानाचा संदेश दिला.


106
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!