न्यु होरायझन येथे विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांनी स्वातंत्र्यदिन रंगला


कवायत, लाठीकाठी प्रात्यक्षिके व समूहगायनाने विद्यार्थ्यांनी दिला देशभक्तीचा संदेश.

उपसंपादक:श्री स्वप्निल कुंभार.

औरनाळ:       न्यू होरायझन स्कूल, पार्वती हायस्कूल औरनाळ आणि जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने ८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्या प्रसारक मंडळाचे सचिव ऍड. बाबुराव भोसकी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

न्यू होरायझन स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. सुनीता पाटील आणि पार्वती हायस्कूलचे मुख्याध्यापक कासार सर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

न्यू होरायझन स्कूलमधील इयत्ता पाचवी, सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगायन सादर केले. पार्वती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लाठीकाठीचे आकर्षक प्रात्यक्षिक सादर केले. तसेच न्यू होरायझन स्कूल व पार्वती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी कवायतीचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमास औरनाळ गावचे सरपंच श्री. संदीप पाटील, औरनाळ गावचे पोलीस पाटील श्री. किशोर कांबळे, प्रतिष्ठित नागरिक बाळासाहेब पाटील यांच्यासह न्यू होरायझन स्कूल, पार्वती हायस्कूल औरनाळ आणि जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गडहिंग्लज येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रोहिणी खंदारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. स्मिता केसरकर यांनी केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांचे उपस्थित मान्यवर, शिक्षक व नागरिकांनी कौतुक केले.

दरम्यान, न्यू होरायझन स्कूलच्या कला विभागाच्या वतीने शाळेची आकर्षक सजावट करण्यात आली होती . या सजावटीचे उपस्थित पाहुणे, विद्यार्थी व नागरिकांनी विशेष कौतुक केले.

विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि एकतेची भावना दृढ व्हावी, या उद्देशाने शाळेच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


102
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!