५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; १५५ लिटर तयार रसायनाचा समावेश
उपसंपादक: श्री स्वप्निल कुंभार.(चंदगड, आजरा, गडहिंग्लज)
आपल्या स्वतःच्या शेतात ओढ्याच्या कडेला हातभट्टी ची दारू तयार करणारा एकजण चंदगड पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना आज शुक्रवार दि.१४ रोजी दुपारी घडली . प्रकरणी लक्ष्मण अप्पया नाईक(वय ४५) रा. रामपूर (डुक्करवाडी) ता. चंदगड याला ताब्यात घेण्यात आले.

घडलेली अधिक माहिती अशी,लक्ष्मण अप्पया नाईक हा बागिलगे ता. चंदगड येथील आपल्या शेतात ओढ्याच्या कडेला राजरोसपणे बेकायदेशीर गावठी दारू तयार करत होता. त्यासाठी त्याने सर्व साहित्याची जमवा जमव केली होती. अनेक घातक रसायने त्याठिकाणी आढळून आली. पोलिसाना याची माहिती कळताच आज दुपारी सदर ठिकाणी छापा टाकून मुद्देमाल सह संशयित आरोपी लक्ष्मण यास ताब्यात घेतले.
घटनास्थळावरून प्लास्टिकचे बॅलर, १५५लीटर तयार रसायन तसेच मातीची भांडी असे ५१हजार ५००रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Views: 158




