महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची भव्य वक्तृत्व स्पर्धा


महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची भव्य वक्तृत्व स्पर्धा

सीमाभागासह चंदगड, आजरा गडहिंग्लज स्पर्धकानाही संधी 

वर्षा कुंभार: खानापूर

मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रासह सीमाभागातही मराठी अस्मितेचा नवा उत्साह संचारला आहे. याच उत्साहाला बळ देण्यासाठी आणि सीमाभागातील तरुण पिढीमध्ये मराठी भाषेबद्दल अभिमान आणि आपुलकीची भावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने बेळगावातील मराठी भाषिकांच्या हक्कासाठी नेहमीच आघाडीवर असणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने एक स्तुत्य पुढाकार घेतला आहे.

समितीच्या वतीने राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या सहकार्याने अभिजात मराठी भाषा सन्मान सप्ताहाचे औचित्य साधून ‘भव्य वक्तृत्व स्पर्धा – वर्ष २ रे’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य मंदिरात होणार आहे.

बेळगाव सीमाभागासह चंदगड, आजरा गडहिंग्लज मर्यादित भागासाठी मर्यादित आहे. 10 ऑक्टोबर पूर्वी नावनोंदणी करायची आहे.

स्पर्धा तीन गटात विभागण्यात आली असून प्रत्येक गटासाठी विषय आणि बक्षिसे पुढीलप्रमाणे आहेत :

१) प्राथमिक गट (इयत्ता ४ थी ते ७ वी) – वेळ ५ + १ मिनिटे

विषय : १) मोबाईल गेम की मैदानी खेळ? २) माझी प्रेरणा : छत्रपती शिवाजी महाराज ३) मी शिक्षणमंत्री झालो / झाले तर? ४) मातृभाषेतून शिक्षण : काळाची गरज

– पारितोषिक : प्रथम रु. १५००/-, द्वितीय रु. १०००/-, तृतीय रु. ७५०/-

२) माध्यमिक गट (इयत्ता ८ वी ते १० वी) – वेळ ७ + १ मिनिटे

विषय : १) मोबाईल संस्कृती : मानवता सेवक की मारक? २) शेती आणि शेतकऱ्यांपुढील आव्हाने ३) मराठी भाषा टिकवण्यासाठी माझे योगदान ४) पर्यावरण संवर्धन : आजची गरज उद्याची जबाबदारी

– पारितोषिक : प्रथम रु. २०००/-, द्वितीय रु. १५००/-, तृतीय रु. १०००/-

३) महाविद्यालयीन गट (११ वी ते पदव्युत्तर) – वेळ १० + १ मिनिटे

विषय : १) कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) : काळाची गरज की भविष्यातील धोका? २) जेन-झी आंदोलन : नव्या काळातील क्रांती? ३) मराठी भाषा संवर्धन : युवकांची भूमिका ४) डिजिटल भारत : संधी, आव्हाने आणि भविष्य

– पारितोषिक : प्रथम रु. २५००/-, द्वितीय रु. २०००/-, तृतीय रु. १५००/-

विजेत्यांना रोख रक्कम, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असून सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत नोंदणी करणे आवश्यक असून प्रत्येक गटात पहिल्या ३० स्पर्धकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

नोंदणी व अधिक माहितीसाठी

श्रीकांत कदम : ७०१९६६८०२५
प्रतीक पाटील : ७३३८१४५६७३
आशिष कोचेरी : ९८८६१०३३७३
अधिक माहितीसाठी संपर्क:
अंकुश अरविंद केसरकर
मो. ९७३९९ ६३२२९
अध्यक्ष म. ए. युवा समिती
१९८/डी, कावळे संकुल, टिळकवाडी, बेळगाव

Advertise….


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!