न्यू होरायझन स्कूल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी.
गडहिंग्लज प्रतिनिधी:श्री स्वप्निल कुंभार.
न्यू होरायझन स्कूल येथे २ ऑक्टोबर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनीता पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस हार व पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. उपस्थितांनी महात्मा गांधी यांच्या महान कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांना अभिवादन केले.

कार्यक्रमात मुख्याध्यापिका सौ. सुनीता पाटील यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याची माहिती देत आपल्या मनोगतातून त्यांच्या सत्य, अहिंसा आणि त्यागाच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट केले. “सत्य, अहिंसा आणि त्यागाच्या बळावर स्वातंत्र्याची पहाट घडविणारे युगपुरुष — महात्मा गांधी,” अशा शब्दांत त्यांनी गांधीजींच्या कार्याचा गौरव केला.
या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. रोहिणी खंदारे मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले


