आगीत ट्रक चे भारी नुकसान; जीवितहानी टळली.
चंदगड प्रतिनिधी : स्वप्नील कुंभार
बेळगाव ते वेंगुर्ला मार्गावरील कुर्तनवाडी गावच्या हद्दीत धावत्या आयशर ट्रकला अचानक आग लागून केबीन व इंजिन जळाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सुमारे ८ लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२७ ऑगस्ट २०२६) पहाटे ३.०० वाजण्याच्या सुमारास सचिन व्यंकटेश शेरेगार (वय ३९, व्यवसाय- ड्रायव्हर, रा. नवीन वसाहत, चंदगड, जि. कोल्हापूर) हे आयशर ट्रक (क्रमांक KA 22 AA 8859) घेऊन जात होते. यावेळी कुर्तनवाडी गावच्या हद्दीत ट्रकच्या वायर जळून अचानक आग लागली. आगीत ट्रकचे केबीन आणि इंजिन पूर्णपणे खाक झाले.
या घटनेबाबत सचिन शेरेगार यांनी चंदगड पोलीस ठाण्यात माहिती (वर्दी) दिली. त्यानुसार दुपारी १३.०४ वाजता अकस्मात जळीत क्र. ०५/२०२६ ची नोंद करण्यात आली आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक गवळी करत आहेत.


