बेदरकारपणे वाहन चालवल्याप्रकरणी चंदगड च्या एकावर गुन्हा


गावच्या हद्दीत झालेल्या या प्रकारामुळे चंदगड पोलीस ठाणे मध्ये गुन्हा नोंद.

चंदगड प्रतिनिधी :

चंदगड गावच्या हद्दीत रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे वाहन चालवल्याप्रकरणी एका व्यक्तीवर चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२७ ऑगस्ट २०२६) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास चंदगड येथे संशयित आरोपी जफिर अब्बासअली मदार (वय ४५, रा. चंदगड, जि. कोल्हापूर) हे आपल्या ताब्यातील टेम्पो ट्रॅक्स (क्रमांक KA 24 M 1756) निष्काळजीपणे व बेदरकारपणे चालवत असताना आढळून आले.

याप्रकरणी चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल बाळकृष्ण त्रिंबक कोळी (वय २९) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून चंदगड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २८९/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याची नोंद २७ ऑगस्ट रोजी रात्री २३.२५ वाजता करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल (पोकॉ १५११) माने करत आहेत.


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!