खानापुरात उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिराची प्रतिकृती


खानापुरात उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिराची प्रतिकृती;

श्री सिद्धिविनायक मंडळाचा स्तुत्य उपक्रम

खानापूर: राजू कुंभार

येथील रेल्वे स्टेशन रोड, विद्या नगर, शाहू नगर येथील श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा गणेशोत्सवाचे औचित्य साधून उज्जैन येथील प्रसिद्ध श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराची भव्य आणि मनमोहक प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या धार्मिक आणि भव्य देखाव्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला असून भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.

या वर्षीच्या गणेशोत्सवाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष साहिल ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. तसेच या उपक्रमासाठी उपाध्यक्ष तरुण रायका, खजिनदार राकेश शहापूरकर, सेक्रेटरी विशाल सावंत, उपसेक्रेटरी बाळासाहेब दळवी आणि उपखजिनदार लखन सोनटक्के यांच्यासह मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराची ही हुबेहूब प्रतिकृती पाहण्यासाठी आणि श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी खानापूर व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. धार्मिक परंपरेचा वारसा जपत उभारण्यात आलेल्या या देखाव्यामुळे यंदाचा गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा होत आहे.


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!