अबब… चक्क १९ दिवसांची सुट्टी!


अबब… चक्क १९ दिवसांची सुट्टी!

खानापूर : राजू कुंभार
राज्यातील लाखो शालेय विद्यार्थ्यांसाठी यंदाचा दसरा आणखी खास ठरणार आहे. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण विभागाने दसरा सुटीचे वेळापत्रक जाहीर केले असून विद्यार्थ्यांना तब्बल १९ दिवसांची सलग सुटी मिळणार आहे. राज्यातील सरकारी, अनुदानित तसेच खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना ही सुटी लागू राहणार आहे.
शैक्षणिक वेळापत्रकानुसार ३ ऑक्टोबर २०२६ ते २१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दसरा सुटी असणार आहे. त्यातच २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीची सार्वजनिक सुटी असल्याने विद्यार्थ्यांना सलग सुट्ट्यांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे दसरा सण, कुटुंबासोबत वेळ आणि सहलींचे नियोजन करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
२२ ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू
दसरा सुटी संपल्यानंतर २२ ऑक्टोबर २०२६ पासून शाळांचे दुसरे शैक्षणिक सत्र सुरू होईल. हे सत्र १० एप्रिल २०२७ पर्यंत चालणार असून, त्यानंतर ११ एप्रिल २०२७ पासून उन्हाळी सुटीला सुरुवात होणार आहे.
दरम्यान, स्थानिक हवामान, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सुटीच्या वेळापत्रकात आवश्यक ते किरकोळ बदल करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्यांच्या उपसंचालकांना देण्यात आले आहेत.
दसऱ्याच्या सुट्टीची ही मोठी घोषणा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची ठरणार असून, सुट्टीचे नियोजन करण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!