अरविंद पाटील यांनी तालुक्यात घडवून आणली दुग्ध क्रांती: विष्णू देसाई यांचे प्रतिपादन


अरविंद पाटील यांनी तालुक्यात घडवून आणली दुग्ध क्रांती: विष्णू देसाई यांचे प्रतिपादन

कोकणवाडा आणि निलावडे येथे नूतन दूध डेअरींचा शुभारंभ; तालुक्यातील २६ हजार लिटर दूध संकलनातून तरुण व महिलांना रोजगा

(प्रतिनिधी – राजू कुंभार):

“माजी आमदार अरविंद पाटील यांनी खानापूर तालुक्यात दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून घडवून आणलेली क्रांती ही खरोखरच सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी दीपस्तंभ ठरली आहे,” असे गौरव उद्गार विष्णू देसाई यांनी काढले. कोकणवाडा आणि निलावडे येथे नवीन दूध डेअरींच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. अरविंद पाटील यांनी आमदार असताना अनेक गावांत दूध डेअरी सुरुवात केल्या. आजही त्यांचे सहकारी संचालक आहेत तेही कर्तबगार आहेत असे ते म्हणाले.

दरवर्षी येणारी पूरस्थिती, दुष्काळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमुळे केवळ शेतीवर अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी आणि शेतीला एक शाश्वत जोडधंदा निर्माण करून देण्यासाठी माजी आमदार अरविंद पाटील यांनी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे, असेही ते म्हणाले.

दररोज २६ हजार लिटर दूध संकलन; २०० हून अधिक हातांना रोजगार!

कार्यक्रमात बोलताना माजी आमदार अरविंद पाटील यांनी तालुक्यातील दुग्धव्यवसायाचा आढावा मांडला. ते म्हणाले, “तालुक्यात आतापर्यंत तब्बल ७७ दूध संकलन डेअरी स्थापन करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून दररोज २६ हजार लिटर दुधाचे यशस्वी संकलन केले जात आहे. या जोडधंद्यामुळे तालुक्यातील २०० हून अधिक महिला आणि तरुणांना थेट रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.”

तसेच अरविंद पाटील यांचे सध्याचे KMF (कर्नाटक मिल्क फेडरेशन) संचालक प्रकाश आंबोजी हे अत्यंत उत्तम आणि कौतुकास्पद कार्य करत असल्याचे अरविंद पाटील यांनी यावेळी नमूद केले.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती:

या प्रसंगी कोकणवाडा डेअरीचे अध्यक्ष विष्णू रामचंद्र देसाई, निलावडे डेअरीचे अध्यक्ष विठोबा सावंत, बळीराम देसाई, तुकाराम देसाई, कृष्णा सावंत, साताप्पा कवळेकर, महादेव कवळेकर, विठ्ठल देसाई, पावनाप्पा देसाई, राजू सावंत, पुंडलिक उचगावकर, संजय देसाई तसेच KMF निरीक्षक मधू गोजगेकर यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक व शेतकरी उपस्थित होते.

Advertise……….


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!