
नागुर्डा येथे दुर्गादेवी उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन
ग्रामदूत वृत्तसेवा(राजू कुंभार)
नागुर्डा (ता. खानापूर) येथे शुक्रवार दि. १६ ऑक्टोबर रोजी श्री दुर्गादेवी उत्सवानिमित्त सुहासिनींकडून ओटी भरणे आणि भव्य महाप्रसादाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यासह मान्यवरांकडून मार्गदर्शन व संस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडणार आहे.
धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद
शुक्रवार दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कार्यक्रमास प्रारंभ होईल. सुहासिनींच्या हस्ते श्री दुर्गादेवीची ओटी भरण्यात येईल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी: सौ. पार्वती गंगाराम महाजन (नागुर्डा – मा. सं., नागुर्डा महिला दूध उत्पादक सहकारी संघ)
दीपप्रज्वलन: सौ. रुक्मिणी विठ्ठलराव हलगेकर (सामाजिक कार्यकर्त्या)
प्रमुख वक्त्या: कु. पद्मश्री मनोहर पाटील (सी.ए. व मा. ग्रा. पं. बरगाव)
प्रमुख उपस्थिती:
सौ. अरुंधती आबासाहेब दळवी (मा. अध्यक्षा, खानापूर तालुका प्राथमिक शिक्षक को-ऑप. क्रेडिट सोसायटी), सौ. सुनिता चंद्रशेखर शेट्टी (खानापूर), सौ. सावित्री रमेश मादार (अध्यक्षा, खानापूर तालुका महिला काँग्रेस आघाडी), सौ. मिनल प्रसाद पाटील(गर्लगुंजी) सौ. सुजाता दत्ता बेळगांवकर (एल.आय.सी. अडव्हायझर), सौ. लक्ष्मी गोपाळ पाटील (मा. जि. पं. सदस्या, गळगुंजी) आणि सौ. सुजाता नारायण भालकेकर (माजी मुख्याध्यापिका, नागुर्डावाडा मराठी शाळा).
विशेष प्रतिमा पूजन
श्री दुर्गादेवी पूजन: सौ. पूजा नामदेव नांदुरकर (नागुर्डा)
श्री गणेश फोटो पूजन: सौ. जयश्री आप्पाना मुरगोड (सं. प्रा. शिक्षक को-ऑप. क्रे. सोसायटी, खानापूर)
श्री नागेशदेव फोटो पूजन: सौ. लिला नागेश पारवाडकर (नागुर्डावाडा)
श्री विठ्ठल रुक्मिणी फोटो पूजन: सौ. हेलण परेरा (आदर्श शिक्षिका, मराठी मुलांची शाळा, खानापूर)
संत तुकाराम महाराज फोटो पूजन: सौ. ए. डी. चोपडे (मा. मुख्याध्यापिका, नागुर्डावाडा)
सत्यनारायण फोटो पूजन: सौ. मंगल प्रभाकर पाटील (आदर्श शिक्षिका, पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, मोदेकोप)
ज्ञानेश्वर महाराज फोटो पूजन: श्रीमती मीरा एस. पाटील (क्रीडा शिक्षिका, देवलती)
सरस्वती फोटो पूजन: सौ. पूजा उदय महाजन (अध्यक्षा, नागुर्डा महिला दूध उत्पादक संघ)
कलावती आई फोटो पूजन: सौ. रेश्मा महेश मुतगेकर (उपाध्यक्षा, नागुर्डा महिला दूध उत्पादक संघ)
प्रमुख अतिथी व निमंत्रित
या कार्यक्रमास नागुर्डा महिला दूध उत्पादक सहकारी संघ व बी.एम.सी. च्या संचालिका सौ. जयश्री दत्ताजी महाजन, सौ. राजश्री अनिल गुरव, सौ. विद्या विलास पाटील, सौ. शांता गंगाराम कुपटगिरीकर, सौ. यशोदा अरुण मानगांवकर, सौ. शांता परशराम चापगांवकर, सौ. माधुरी मारुती पाटील आणि सौ. संगिता गंगाराम चापगांवकर उपस्थित राहणार आहेत.
तसेच नागुर्डा पूर्ण प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. रमेश मादार, कन्नड शिक्षक श्री. अर्जुन तोपखाने, शिक्षिका सौ. विद्या बापशेट, सौ. सुनिता कटारी व सौ. स्नेहा देसाई (पी.एच.डी.) यांचीही उपस्थिती असणार आहे.
पत्रकार श्री. वासुदेव चौगुले (दै. पुढारी) आणि सौ. वर्षा राजू कुंभार (संपादक, ग्रामदूत) हे देखील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्ञानेश्वर पाटील हे करणार असून प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा. प पिडीओ प्रविण सायनाक तसेच इतर कर्मचारी नागुर्डा,वाडा आणि विश्रांतवाडी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार आहेत.
या धार्मिक सोहळ्यास तसेच महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी व भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

