KHPS लोंढा शाळेचे क्लस्टर लेव्हल क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश


KHPS लोंढा शाळेचे क्लस्टर लेव्हल क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

कबड्डी आणि खो-खोत मिळवला प्रथम क्रमांक

खानापूर: राजू कुंभार

के.एच.पी.एस. (KHPS) लोंढा शाळेच्या खेळाडूंनी क्लस्टर लेव्हल क्रीडा स्पर्धेत आपली छाप पाडत चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट क्रीडाकौशल्याच्या जोरावर शाळेने विविध मैदानी खेळांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत सर्वसाधारण वर्चस्व सिद्ध केले. स्पर्धेत मुलांच्या कबड्डी संघाने आणि मुलींच्या कबड्डी संघाने प्रतिस्पर्धी संघांवर मात करत दोन्ही विभागांत प्रथम क्रमांक पटकावला. यासोबतच, मुलींच्या खो-खो संघानेही आपल्या चपळतेच्या जोरावर विजेतेपद पटकावून प्रथम क्रमांक मिळवला. मैदानी धावण्याच्या शर्यतीत शाळेची खेळाडू रोशनी राम गावडे हिने वैयक्तिक कामगिरीत बाजी मारली. तिने ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक आणि २०० मीटर धावण्याच्या शर्यतीतही पहिला क्रमांक पटकावून दुहेरी मुकुट मिळवला. विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेच्या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक मस्करेन सर, शिक्षक भीष्म एच., सहशिक्षिका रूपाली कमार आणि अक्षता संबर्गी यांनी खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन देऊन सराव करून घेतला होता. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल एस.डी.एम.सी. (SDMC) अध्यक्ष विश्वनाथ केसरेकर, सर्व शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थांनी विजेत्या खेळाडूंचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुढील स्तरावरील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertise


102
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!