कानूर खुर्दच्या उपसरपंचपदी विशाल गावडे


भाजप समर्थकांचा जल्लोष; एका मताने मिळवला विजय

कानूर खुर्द प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.

चंदगड तालुक्यातील कानूर खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक चुरशीची ठरली. भाजप समर्थक युवा कार्यकर्ते विशाल विठ्ठल गावडे यांनी प्रतिस्पर्ध्यावर एका मताने मात करत उपसरपंचपदावर बाजी मारली. निकाल जाहीर होताच समर्थकांनी आनंद व्यक्त करत गावात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

ग्रामपंचायतीचे सरपंचपद यापूर्वीच गुंडोपंत गणेश कवाडी यांच्याकडे आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड प्रक्रियेत विशाल गावडे यांची उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली. या निवडीत ग्रामपंचायत सदस्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

निवडीनंतर उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी नवनिर्वाचित उपसरपंचांचे अभिनंदन केले. गावाच्या विकासासाठी नव्या नेतृत्वाकडून अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या.

यावेळी ग्रामसेवक अंकुश पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक मनोहर बालाजी पाटील, तसेच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशाल गावडे यांनी ग्रामस्थांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली. ग्रामस्थांच्या सहकार्याने विकासकामांना अधिक गती देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.


102
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!