कान्सुली येथे उद्या कबड्डी स्पर्धा 


कान्सुली येथे उद्या कबड्डी स्पर्धा 

खानापूर: राजू कुंभार

कान्सुली(ता.खानापूर-बेळगाव) येथे उद्या १९ सप्टेंबर २०२६, सायंकाळी ८:०० वाजता खास गणेश उत्सवानिमित्त निमित्त भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ‘एक गाव एक संघ’ या संकल्पनेवर आधारित असून राज्याबाहेरील स्पर्धक ही भाग घेऊ शकतात.

या स्पर्धेत ५८ किलो (त्या पेक्षा खाली) वजनातील ५ आणि ६० किलो चे २ स्पर्धक गटात खेळवली जाईल.

स्पर्धेसाठी प्रवेश फी: ₹१,५००/- असून प्रथम क्रमांक: ₹२०,००० आणि चषक, द्वितीय क्रमांक: ₹१०,००० आणि चषक,तृतीय क्रमांक: ₹५,००० आणि चषक अशी बक्षिसे आहेत.

महत्वाचे नियम व अटी:

* ग्राउंडवर दोन्ही टीमच्या समोर वजन केले जाईल.

* खेळाडूंना काही दुखापत झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही.

* एकदा भरलेली प्रवेश फी परत मिळणार नाही.

* पंचांचा निर्णय अखेरचा मानला जाईल.

* सर्व खेळाडूंनी आपले ओरिजिनल आधार कार्ड सोबत आणणे अनिवार्य आहे.

संपर्क क्रमांक:स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ९९४५४ ८९६६९, ९९८०७ ३४२४० किंवा ९८८०८ ४२०५० या क्रमांकांवर संपर्क साधावा.


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!