तालुक्याची आरोग्य व्यवस्था सलाईनवर; 19 डॉक्टर रिक्त 


तालुक्याची आरोग्य व्यवस्था सलाईनवर; 19 डॉक्टर रिक्त 

रुग्णांचा जीव टांगणीला?आरोग्य व्यवस्थेचा धक्कादायक चेहरा!

खानापूर : राजू कुंभार 

खानापूर तालुक्यातील सरकारी आरोग्य व्यवस्थेची धक्कादायक स्थिती समोर आली आहे. उपलब्ध अधिकृत माहितीनुसार, खानापूर तालुका सार्वजनिक रुग्णालयासह ६० खाटांचे माता व बालक रुग्णालय, नंदगड समुदाय आरोग्य केंद्र तसेच तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी व तज्ज्ञांची 19 पदे रिक्त आहेत. यापैकी काहीं जागांवर कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर डॉक्टरांनी पाठविण्यात आले आहे.

सुसज्ज भलामोठा दवाखाना मात्र आतमध्ये डॉक्टरच नाहीत. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आपल्या पक्षाचे काम बाजूला ठेवून जनतेच्या या प्रमुख समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे.

खानापूर तालुका सार्वजनिक रुग्णालय

कान-नाक-घसा डॉक्टर व त्वचारोग डॉक्टर नाहीये, आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागांमध्ये 4 पदे रिक्त आहेत यापैकी 3 जागांवर कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर सहाय्यक आहेत.

६० खाटांच्या माता व बालक रुग्णालय

स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञ कार्यरत असल्याची नोंद असली तरी त्यांना गरजेचे असणारे रेडिओलॉजिस्टचे पद रिक्त आहे. त्याचबरोबर एका बालरोग तज्ज्ञाने राजीनामा दिल्याची नोंदही कागदपत्रात आहे. बालरोग तज्ज्ञ नसणारे माता शिशु हॉस्पिटल कसे काय असू शकते?हा हास्यास्पद प्रश्न आहे.

नंदगड सिव्हिल हॉस्पिटल

भूलतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञांची(कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे)पदे रिक्त असल्याची नोंद आहे; वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याचे पदही रिक्त असल्याचे कागदपत्रातून स्पष्ट होते.

तालुक्यात असलेल्या खालील PHC सेंटर मध्येही वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त आहेत

अशोकनगर (DCकॉन्ट्रॅक्ट), बिडी , गणेबैल(DCकॉन्ट्रॅक्ट), हलशी(DCकॉन्ट्रॅक्ट), इटगी ,कक्केरी(DCकॉन्ट्रॅक्ट), कणकुंबी(DCकॉन्ट्रॅक्ट), लोंडा(DCकॉन्ट्रॅक्ट) आणि पारिश्वाड यांसारख्या केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त असल्याची नोंद आहे.

रुग्णांना आर्थिक भुर्दंड 

सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता राहिल्यास गंभीर रुग्णांना पुढील उपचारांसाठी मोठ्या खासगी रुग्णालयांकडे जावे लागत असून मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. आमदारांनी याकडे लक्ष देऊन डॉक्टरांची त्वरित नेमणूक करावी.

ॲड.आय.आर घाडी (ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष)

Advertise…….


118
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!