गडहिंग्लज तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न


१०३ संघातील १२३६ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग 

सौ.वि.दि., जागृती, आर. के. मुलात तर महागाव, नंदनवाड, संभाजीराव मानेला मुलीत विजेतेपद.

गडहिंग्लज प्रतिनिधी :(संपत सावंत )

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व गडहिंग्लज तालुका क्रीडाशिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय शासकीय १४, १७ व १९ वर्षाखालील मुला मुलींच्या तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा शिवराज महाविद्यालयाच्या प्रशस्त मैदानावर अतिशय उत्साही वातावरणात पार पडल्या. या स्पर्धेत तब्बल १०३ संघामधून १२३६ खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. 

स्वागत स्पर्धा प्रमुख विकास दावणे यांनी तर संदेश कोकितकर यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धेचे उद्घाटन सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक विजय आबिटकर व तानाजी पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी मुख्याध्यापक वैजनाथ पालेकर, बाबुराव गाडीवड्डर उपस्थित होते.१४ वर्षाखालील मुलांच्या गटात २६ तर मुलींच्या गटात १५ संघाने भाग घेतला. १७ वयोगटात मुला मुलींचे ५१ संघ होते तर १९ वर्षाखालील गटात मुला मुलींचे ११ संघ सहभागी झाले होते. 

स्पर्धेचा गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे-

१४ वर्षाखालील मुले- विजेता सौ.वि.दि शिंदे, उपविजेता कलमेश्वर सांबरे 

मुली- विजेता महात्मा फुले महागाव, उपविजेता श्री शिवराय नंदनवाड 

१७ वर्षाखालील मुले- विजेता जागृती हायस्कूल, उपविजेता जय भारत महागाव 

मुली- विजेता श्री शिवराय नंदनवाड, विजेता महात्मा गांधी नरेवाडी 

१९ वर्षाखालील मुले- विजेता जागृती ज्युनिअर, उपविजेता संभाजीराव माने.

मुली- विजेता संभाजीराव माने, उपविजेता जागृती ज्युनि.

विजेत्या संघाची निवड भोगावती महाविद्यालय कुरुकली (ता. करवीर) या ठिकाणी झाली. स्पर्धेचे परीक्षण विनायक नाईक, संपत सावंत, जयवंत पाटील, मदन दंडगीदास, विनायक शिंदे, विकास दावणे, संदेश कोकितकर, रमेश चौगुले, विकास पाटील, राहुल रेडेकर, दयानंद ग्वाडी, सुभाष तिप्पे ,देवदत्त पाटील, देवदत्त कांबळे, राजेंद्र शेलार, बिरजे सर, संजय माने यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास पाटील यांनी तर आभार रमेश चौगुले यांनी मानले.


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!