जमीन वादातून भाच्याचा हल्ला; फॉरेन्सिक पथकाकडून तपास.
उपसंपादक श्री स्वप्निल कुंभार. (चंदगड,आजरा,गडहिंग्लज)
गडहिंग्लज : गडहिंग्लज येथील वर्दळीच्या वीरशैव चौक संकेश्वर रोड गडहिंग्लज अर्बन बँक येथे आज सकाळी सुमारास दहाच्या वाजण्याच्या सुमारास थरारक घटना घडली. गडहिंग्लज अर्बन बँकेचे शिपाई कर्मचारी वीरूपाक्ष रामपुरे यांच्यावर चाकूने हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, रामपुरे यांचा भाचा सतीश सुरेश खंगोरे (रा. हेब्बाळ) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शेतजमिनीच्या कारणावरून वाद सुरू होता. याच वादातून सतीश खंगोरे याने रामपुरे यांच्यावर चाकूने वार केल्याची माहिती मिळाली आहे. हल्ल्यानंतर संशयिताने घटनास्थळावरून पलायन केले असून तो फरार असल्याचे सांगण्यात आले.

हल्ल्यात वीरूपाक्ष रामपुरे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना सीपीआर रुग्णालय, कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. तपासणीदरम्यान आढळलेला चाकू तसेच इतर साहित्य पथकाने ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास गडहिंग्लज पोलीस करत आहेत.


