हाजगोळी येथे जुन्या वादातून एकावर लाठी-काठ्यांनी हल्ला;


 ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

उपसंपादक : श्री स्वप्निल कुंभार. (चंदगड,आजरा, गडहिंग्लज)

राजू कुंभार:हाजगोळी (ता. चंदगड) येथे जुन्या वादाचा राग मनात धरून एका व्यक्तीवर लाठी-काठ्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चंदगड पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय वैजू गावडे यानी दाखल केलेल्या फिर्यादीत १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता हाजगोळी येथील प्रेमा कनगुटकर यांच्या घरात हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे असून एकाच गल्लीमध्ये राहतात. जुन्या वादाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीच्या मुलास दिपा पाटील हिला मेसेज का करतोस, असे विचारत त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर अभिजीत अशोक पाटील, आश्विन राजाराम कनगुटकर, क्रांतीराज केदारी पाटील, आकाश दिनकर पाटील, केदारी लक्ष्मण पाटील, अशोक लक्ष्मण पाटील, विशाल गावडे,दयानंद रामू गावडे सर्व रा. हजगोळी तसेच स्वप्नील जयवंत पाटील यांनी फिर्यादीच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तसेच, इतर आरोपींनी एकत्र येऊन लाथाबुक्क्यांनी व हातातील कड्यानी मारहाण करून धमकी दिल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. या मारहाणीत फिर्यादीच्या मुलाला दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर त्याला पाहण्यासाठी आलेल्या पाहुणे बाळकृष्ण बाबू बोकेडे यांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

वरील सर्व संशयित आरोपी विरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम 118(1), 115(2), 189(2), 191(2), 190, 352, 351(2) तसेच महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 37(1) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

१९ ऑगस्ट २०२६ रोजी तक्रार दाखल झाल्यानंतर चंदगड न्यायालयाच्या आदेशानुसार प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आंबुलकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.


102
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!