गर्लगुंजीच्या मुलींची बाजी!


गर्लगुंजीच्या मुलींची बाजी!

खो-खो स्पर्धेत तिन्ही गटांत पटकावला प्रथम क्रमांक; जिल्हा पातळीवर  निवड 

राजू कुंभार

तालुका पातळीवरील १४ वर्षांखालील व १७ वर्षांखालील खो-खो क्रीडा स्पर्धांचे यजमानपद यंदा गर्लगुंजी गावाला मिळाले होते. या स्पर्धेत गर्लगुंजीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत ऐतिहासिक यश संपादन केले आहे. प्राथमिक मुलांची शाळा, प्राथमिक मुलींची शाळा आणि माध्यमिक माऊली कन्या विद्यालय या तिन्ही शाळांनी खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून गावाचे नाव क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे.

या वर्षी प्रथमच खो-खो स्पर्धेतील तिन्ही प्रथम क्रमांक मिळवून गर्लगुंजी गावाने तालुका पातळीवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या घवघवीत यशाबद्दल सर्व खेळाडू विद्यार्थी-विद्यार्थिनींचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा कौशल्य रुजवून त्यांना घडवण्यात मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, सहशिक्षक, पालक, शाळा सुधारणा कमिटी तसेच गावातील युवक मंडळांचा मोठा वाटा आहे. विशेषतः ‘एकलव्य क्रीडा केंद्र’ व ‘न्यू मराठा स्पोर्ट्स क्लब’ यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनातून हे होनहार खेळाडू तयार होत आहेत.

तालुका पातळीवर अजिंक्यपद मिळवून सर्व खेळाडूंची आता जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व विजेत्या खेळाडूंचे, मार्गदर्शकांचे आणि ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, जिल्हा पातळीवरील पुढील वाटचालीसाठी त्यांना उदंड शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Advertise ….


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!