विकृत शिक्षकाकडून लैंगिक शोषण;विद्यार्थिनींनी दाखवले धैर्य


विकृत शिक्षकाकडून लैंगिक शोषण;विद्यार्थिनींनी दाखवले धैर्य

चाइल्ड हेल्पलाइन’ला फोन अन् विकृत शिक्षकावर गुन्हा 

कोप्पळ:गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या एका विकृत शिक्षकाला त्याच्याच शाळेतील विद्यार्थिनींनी उत्तम धडा शिकवला आहे. ‘अन्याय सहन करायचा नाही’ हे दाखवून देत विद्यार्थिनींनी दाखवलेल्या धैर्यामुळे कोप्पळ येथील एका शाळेतील शिक्षकाची विकृती चव्हाट्यावर आली आहे.

नक्की काय घडले?

अंदनगौडा हा शिक्षक वर्गात विद्यार्थिनींना बोलवून त्यांचा लैंगिक छळ करत असे आणि अश्लील वर्तन करायचा. “शिक्षक आहे म्हणून गप्प राहायचे नाही” असा निर्धार करत पीडित विद्यार्थिनींनी घाबरण्याऐवजी धाडसाने ‘चाइल्ड हेल्पलाइन १०९८’ (1098) वर संपर्क साधला आणि घडलेला प्रकार सांगितला.

विद्यार्थिनींच्या धैर्यामुळे झाली कडक कारवाई

विद्यार्थिनींच्या या एका फोनमुळे प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हा बाल संरक्षण घटकाच्या (DCPU) अधिकाऱ्यांनी शाळेत येऊन चौकशी केली असता, विद्यार्थिनींनी न घाबरता अधिकाऱ्यांसमोर आरोपी शिक्षकाचे पितळ उघडे पाडले.

* पोक्सोअंतर्गत गुन्हा: मुख्याध्यापिकांनी दिलेल्या तक्रारीवरून कोप्पळ महिला पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

* शिक्षकाचे निलंबन: शिक्षण विभागाने आरोपी शिक्षकाला तातडीने सेवेतून निलंबित केले आहे.

* आरोपी फरार: गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या या शिक्षकाला पकडण्यासाठी पोलिसांनी तीन विशेष पथके तैनात केली आहेत.

विद्यार्थिनींनी दाखवलेल्या या सतर्कतेमुळे आणि धैर्यामुळे इतर मुलींनाही अन्यायविरुद्ध आवाज उठवण्याची मोठी प्रेरणा मिळाली आहे.


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!