
अब्बब! शिक्षण विभागात तब्बल वर्षातून दोनदा मिळणार पदोन्नती!
लाखों शिक्षक-कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; राज्य सरकारच्या ऐतिहासिक परिपत्रकाने आनं
राजू कुंभार: खानापूर
कर्नाटक राज्यातील शिक्षक आणि शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंददायी बातमी समोर आली आहे! आतापर्यंत पदोन्नतीसाठी (प्रमोशन) वर्षांनुवर्षे वाट पहावी लागणाऱ्या अधिकारी व शिक्षकांना आता वर्षातून थेट दोनदा पदोन्नती मिळणार आहे. शिक्षण विभागाच्या या सनसनाटी आणि ऐतिहासिक निर्णयामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आनंदाची लाट पसरली आहे!
नेमका काय आहे हा मोठा निर्णय?
कर्नाटक राज्य शिक्षण विभागाच्या आयुक्त कार्यालयाने १६ ऑक्टोबर रोजी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. यानुसार, सेवाज्येष्ठता आणि गुणवत्तेच्या (पात्रतेच्या) आधारे वर्षातून तब्बल दोन वेळा पदोन्नतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासून लटकलेले पदोन्नतीचे प्रश्न आता चुटकीसरशी सुटणार आहेत.
अन् संघटनेच्या लढ्याला आले अफाट यश!
कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेने पदोन्नतीची ही प्रक्रिया वेळेत आणि नियमित व्हावी, यासाठी जोरदार मागणी लावून धरली होती. संघटनेच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, शिक्षण आयुक्तांनी थेट परिपत्रकच काढून या ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.
आता लक्ष उपसंचालकांच्या चालीकडे!
हा निर्णय जितका धक्कादायक आणि मोठा आहे, तितकीच त्याची अंमलबजावणी आव्हानात्मक मानली जात आहे. आयुक्त कार्यालयाने आदेश तर जारी केले, पण उपसंचालक स्तरावर याची अंमलबजावणी वेगाने होणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. पात्र शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना वेळेत न्याय मिळावा आणि कोणीही पदोन्नतीपासून वंचित राहू नये, अशी जोरदार अपेक्षा आता व्यक्त होत आहे.
Advertise


