दीक्षाभूमी यात्रेस जाणाऱ्याना रवी पाटलांकडून शुभेच्छा 


दीक्षाभूमी यात्रेस जाणाऱ्याना रवी पाटलांकडून शुभेच्छा 

खानापूर: राजू कुंभार 

समाज कल्याण विभाग यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी नागपूर यात्रेचा शुभारंभ अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. खानापूर येथील आंबेडकर गार्डनसमोर हा प्रेरणादायी शुभारंभ सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजप कार्यालय सचिव श्री. रवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथील ‘दीक्षाभूमी’ येथे आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. हा दिवस ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ म्हणून अत्यंत पवित्र मानला जातो.दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आणि विशेषतःऑक्टोबर महिन्यात देशभरातून लाखो अनुयायी, बौद्ध बांधव आणि भाविक विशेष रेल्वेने, बसने व वाहनांनी नागपूरच्या दीक्षाभूमीला भेट देण्यासाठी येतात तालुक्यातुनही अनेकजण रवाना झाले असल्याची माहिती रवी पाटील यांनी दिली.

या प्रसंगी सुरेश शिंगे, राजशेखर किंडलगी,. राघवेंद्र चलवादी आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच, या दीक्षाभूमी यात्रेसाठी खानापूर तालुक्यातील समस्त समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी, नागपूर दीक्षाभूमी यात्रेला जाणाऱ्या सर्व प्रवाशांचे व भाविकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांना एक सुरक्षित, आनंददायी आणि मंगलमय प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Advertise


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!