
जांबोटी-काणकुंबी रस्त्यावर भीषण अपघात; गोवा पासिंगची कार उलटली, मोठा ट्रॅफिक जॅम!
राजू कुंभार:
जांबोटी-काणकुंबी मार्गावर (जांबोटीपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर) एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. या अपघातात गोवा पासिंगची एक कार आणि एका नवीन टाटा कारची जोरदार धडक झाली.
स्थानीय लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, धडक इतकी जोरदार होती की गोवा पासिंगची कार थेट रस्त्यावर पलटी झाली. तर दुसऱ्या टाटा कारचे एअरबॅग्ज (Airbags) उघडले, यावरून अपघाताची तीव्रता स्पष्ट होते.
सुदैवाने मोठा अनर्थ टळला:
एवढा मोठा अपघात होऊनही सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झालेली नाही, असा प्राथमिक अंदाज स्थानिकांनी वर्तवला आहे.
वाहतुकीची मोठी कोंडी:
अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
अपघात नेमका कसा आणि कोणत्या कारणामुळे झाला, याचा शोध घेतला जात असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
Advertise




