आमट्याच्या टिप्पर चालकाकडून वडगावच्या तरुणाचा अपघात 


आमट्याच्या टिप्पर चालकाकडून वडगावच्या तरुणाचा अपघात गुन्हा दाखल 

खानापूर:

बेळगाव-चोर्ला रस्त्यावर कणकुंबी गावाच्या हद्दीत डेल्टा ढाब्याजवळ टिप्पर आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बेळगाव येथील ४४ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी, २९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७:३० वाजता घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव रवी कृष्णा तुळजाई (वय ४४ वर्षे, रा. आनंद नगर, वडगाव, बेळगाव) असे आहे.

घटनाक्रम:

दिनांक २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास आरोपी टिप्पर चालक विलास अर्जुन गावकर (वय २० वर्षे, रा. अमटे, ता. खानापूर) हा आपल्या ताब्यातील टिप्पर वाहन (क्रमांक KA-04/E-8192) जांबोटीकडून गोव्याच्या दिशेने अतिवेगाने व निष्काळजीपणाने चालवून घेऊन जात होता. कणकुंबी गावाच्या हद्दीत डेल्टा ढाब्याजवळ पोहोचल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून गोव्याच्या बाजूने येणाऱ्या कारला (क्रमांक KA-22/M-5226) जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात कार चालक रवी कृष्णा तुळजाई यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत टिप्पर चालकही किरकोळ जखमी झाला आहे.

पोलिसांत गुन्हा दाखल:

याप्रकरणी तक्रारदार श्रीमती विद्या अजय पाटील (वय ४२ वर्षे, रा. होंडा साखळी, गोवा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा नोंद: खानापूर पोलीस ठाणे (गुन्हा क्र. २५५/२०२६)कलम: २८१, १२५(अ), १०६(१) बी.एन.एस. (BNS)पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!