चिकोडीतील चालकाविरोधात गुन्हा दाखल; २८ हजारांचा माल ताब्यात
संकेश्वर प्रतिनिधी :
हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्या नजीक संकेश्वर पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध गोमांस वाहतूक उघडकीस आणली आहे. चिकोडीहून संकेश्वरमार्गे बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या एका टेम्पोमधून तब्बल १०० किलो गोमांस जप्त करण्यात आले असून, याची बाजारातील किंमत सुमारे २८ हजार रुपये इतकी आहे.
मिळालेल्या सविस्तर बातमीनुसार, सोमवारी (२८ सप्टेंबर) दुपारी २ च्या सुमारास पोलीस पथकाने संशयावरून ‘टाटा इंट्रा’ (क्रमांक KA 23 B 8391) या मालवाहू वाहनाला थांबवून झडती घेतली. या तपासणीदरम्यान वाहनात बेकायदेशीरपणे नेले जाणारे गोमांस आढळून आले.
या प्रकरणी पोलिसांनी वाहन आणि गोमांस जप्त केले असून चिकोडी येथील चालक इरफान मजीद नाईकवाडी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. संकेश्वर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

