खानापूरच्या शिक्षकाकडे जिल्ह्याचे नेतृत्व


खानापूरच्या शिक्षकाकडे जिल्ह्याचे नेतृत्व

राजू कुंभार: खानापूर

कर्नाटक स्टेट सेकंडरी टीचर असोसिएशन (आर.), बेंगलोर च्या बेळगाव जिल्हाध्यक्षपदी ‘श्री माऊली विद्यालय, कणकुंबी’ चे मुख्याध्यापक श्री सुनील जी. चिगुलकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. खानापूर तालुक्यातील एका अनुभवी शिक्षकाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

श्री सुनील चिगुलकर यांनी यापूर्वी कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे पाच वर्षे तालुकाध्यक्ष म्हणून उत्तम सेवा बजावली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचा दीर्घ अनुभव, मुख्याध्यापक पदाच्या कालावधीत शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी केलेले कार्य आणि संघटनात्मक कौशल्य लक्षात घेऊन असोसिएशनने त्यांच्यावर ही जिल्हाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

या निवड कार्यक्रमावेळी संघाचे राज्याध्यक्ष संदीप बुधियाळ जी, राज्य उपाध्यक्ष चिदानंद पाटील जी, कार्यदर्शी आर. पी. वंटगुडी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

आपल्या निवडीनंतर बोलताना, माध्यमिक शिक्षकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आणि संघटनेचे कार्य अधिक मजबूत करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे चिगुलकर यांनी सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल शैक्षणिक वर्तुळातून, विविध शिक्षक संघटनांकडून आणि स्थानिक नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Advertise…..


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!