ग्रामसभेत गोंधळ; सरपंच आक्रमक


नियमबाह्य वर्तन खपवून घेणार नसल्याचा इशारा; सरपंच संतोष मोरे यांची भूमिका स्पष्ट.

उपसंपादक: श्री स्वप्निल कुंभार. (चंदगड,आजरा, गडहिंग्लज)

चंदगड : चंदगड तालुक्यातील कुरणी-धामापूर-नांदुरे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सरपंच संतोष मोरे व ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषद घेत ग्रामपंचायतीची भूमिका स्पष्ट केली. ग्रामसभेचे कामकाज सुरू असताना काहींनी गोंधळ घालून अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

बदनामी करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

ग्रामस्थांना ग्रामसभेत प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र प्रश्न मांडताना नियमांचे पालन करणे आवश्यक असून, गैरसमज निर्माण करणारे आरोप किंवा वैयक्तिक टीका सहन केली जाणार नाही, असा इशारा सरपंच मोरे यांनी दिला. ग्रामसभेतील वातावरण बिघडविणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 निधीचा वापर योग्य पद्धतीने केला.

गेल्या अडीच वर्षांत ग्रामपंचायतीमार्फत विविध विकासकामे करण्यात आली असून, निधीचा गैरवापर किंवा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप निराधार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. विकासकामे, निधी व आर्थिक व्यवहारांबाबत ग्रामस्थांच्या प्रश्नांना अधिकृत कागदपत्रांच्या आधारे उत्तर देण्याची तयारी ग्रामपंचायतीने दर्शविली.

शासनाचा नियमानुसारच शिपाई भरती 

शिपाई भरती प्रक्रियाही शासनाच्या नियमांनुसारच राबविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. ग्रामपंचायतीचे कामकाज शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच संतोष मोरे यांनी केले. यावेळी उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक व महिला सदस्य उपस्थित होते.


107
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!