चंदगड तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये कोवाडच्या स्पर्धकांचे वर्चस्व.


१४, १७ व १९ वर्षांखालील गटांत १५० विद्यार्थ्यांचा सहभाग; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी ३० स्पर्धकांची निवड.

कोवाड प्रतिनिधी : श्री स्वप्निल कुंभार.

चंदगड तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा श्री राम विद्यालय, कोवाड येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. तालुक्यातील विविध शाळांमधून आलेल्या सुमारे १५० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग घेत बुद्धिबळाच्या पटावर आपल्या बौद्धिक कौशल्याचा कस लावला.

स्पर्धेचे उद्घाटन अशोकरावजी देसाई (कोवाडकर सरकार) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धाप्रमुख विनायक पाटील सर, तालुका समन्वयक इम्रान पठाण सर, ईश्वर गावडे, दशरथ पाटील सर यांच्यासह विविध शाळांचे समन्वयक, शिक्षक व क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते.

१४, १७ आणि १९ वर्षांखालील मुले व मुली अशा एकूण सहा गटांत स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक गटातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ३० विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेची पात्रता मिळवली. विद्यार्थ्यांनी एकाग्रता, संयम, डावपेच आणि अचूक निर्णयक्षमता यांचे दर्शन घडवत स्पर्धेत रंगत आणली.

स्पर्धेतील निकाल

१४ वर्षांखालील मुले:

ऋग्वेद रवींद्र हेब्बाळकर — श्रीराम विद्यालय, कोवाड — प्रथम

ओमकार धोंडीबा पाटील — श्रीराम विद्यालय, कोवाड — द्वितीय

आर्यन देवेंद्र कुराडे — श्रीराम विद्यालय, कोवाड — तृतीय

युवराज मनोज तुपारे — श्री छत्रपती शहाजी हायस्कूल, पाटणे — चतुर्थ

स्वरूप दिलीप कोकितकर — श्री नागनाथ हायस्कूल, नागरदळे — पाचवा

१४ वर्षांखालील मुली:

रसिका गुरुप्रसाद तेली — श्रीराम विद्यालय, कोवाड — प्रथम

निधी रत्नाकर पोटे — फादर एग्नेल स्कूल, चंदगड — द्वितीय

समृद्धी शिवाजी गावडे — श्री छत्रपती शहाजी हायस्कूल, पाटणे — तृतीय

जानवी युवराज मुर्डेकर — श्रीराम विद्यालय, कोवाड — चतुर्थ

अदिती सुनील कारेकर — श्रीराम विद्यालय, कोवाड — पाचवा

१७ वर्षांखालील मुले:

निखिल युवराज मुर्डेकर — जयप्रकाश विद्यालय, किणी — प्रथम

श्रीज्योत विलास पाटील — श्रीराम विद्यालय, कोवाड — द्वितीय

हर्षवर्धन सतीश बामणे — गुरुवर्य गुरुनाथ वि. पाटील ज्युनिअर कॉलेज, हलकर्णी — तृतीय

अतुल नामदेव ओऊळकर — मामासाहेब लाड विद्यालय, ढोलगरवाडी — चतुर्थ

वीरेंद्र मारुती कुंभार — श्रीराम विद्यालय, कोवाड — पाचवा

१७ वर्षांखालील मुली:

सोनम सुनील कारेकर — श्रीराम विद्यालय, कोवाड — प्रथम

सहर्ष दशरथ अतीवाडकर — श्रीराम विद्यालय, कोवाड — द्वितीय

वेदांती रवींद्र वर्पे — मान. आमदार बी. एस. पाटील हायस्कूल, होसूर — तृतीय

ऋतुजा राहुल पाटील — श्री व्ही. के. चव्हाण-पाटील विद्यालय, कागणी — चतुर्थ

स्नेहल सचिन घेवारी — फादर एग्नेल स्कूल, चंदगड — पाचवा

१९ वर्षाखालील मुले :

आर्यन अशोक पाटील — श्रीमान व्ही. पी. देसाई उच्च माध्यमिक विद्यालय, कोवाड — प्रथम

राजकुमार रणजीत पाटील — श्रीमान व्ही. पी. देसाई उच्च माध्यमिक विद्यालय, कोवाड — द्वितीय

महादेव नागेश गावडे — गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील ज्युनिअर कॉलेज, हलकर्णी — तृतीय

ज्ञानदेव पुंडलिक गावडे — गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील ज्युनिअर कॉलेज, हलकर्णी — चतुर्थ

मयुरेश विलास पाटील — श्रीमान व्ही. पी. देसाई उच्च माध्यमिक विद्यालय, कोवाड — पाचवा

१९ वर्षांखालील मुली:

सलोनी शिवाजी चव्हाण — दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भू. पाटील ज्युनिअर कॉलेज, चंदगड — प्रथम

अर्पिता प्रकाश जाधव — श्रीराम विद्यालय, कोवाड — द्वितीय

सरिता शिवाजी जोशीलकर — श्रीमान व्ही. पी. देसाई उच्च माध्यमिक विद्यालय, कोवाड — तृतीय

ज्योत्स्ना जोतिबा जोशीलकर — श्रीराम विद्यालय, कोवाड — चतुर्थ

नयन नारायण पाटील — श्रीराम विद्यालय, कोवाड — पाचवा

स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे उपस्थित शिक्षक, मार्गदर्शक तसेच स्पर्धेच्या आयोजकांकडून अभिनंदन करण्यात आले. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!