चंदगड पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सव २०२६ पूर्वतयारी बैठकीचे आयोजन


गणेशोत्सव  सुरक्षित, शांततेत व आनंदात पार पाडण्यासाठी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन.

उपसंपादक: श्री स्वप्निल कुंभार.

      आगामी गणेशोत्सव नियोजनबद्ध, सुव्यवस्थित, शांततेत आणि उत्साहात पार पाडण्याच्या उद्देशाने चंदगड पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि सर्व घटकांमध्ये योग्य समन्वय राहावा, यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

​बैठकीची महत्त्वाची माहिती:

​तारीख व वेळ: शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता.

​ठिकाण: रवळनाथ मंदिर हॉल, चंदगड.

​प्रमुख उपस्थिती: श्री. विवेक पाटील (उपविभागीय पोलीस अधिकारी, गडहिंग्लज विभाग, कोल्हापूर).

​निमंत्रक: श्री. एन. आर. चौखंडे (पोलीस निरीक्षक, चंदगड पोलीस ठाणे) व सर्व चंदगड पोलीस स्टाफ.

​बैठकीस निमंत्रित घटक:

​*सर्व नगरपरिषद नगराध्यक्ष, नगरसेवक व नगरसेविका.

​*सर्व गावांतील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य.

​*तलाठी, महसूल कर्मचारी व पोलीस पाटील.

​*शांतता कमिटी पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक संघटना.

*​गणेश मंडळांचे पदाधिकारी, अध्यक्ष व सर्व कार्यकर्ते.

*​ट्रॉली चालक-मालक.

​*डिजिटल मीडिया रिपोर्टर व सर्व सन्माननीय पत्रकार बंधू.

​चंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व नागरिक, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी या बैठकीस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपले योगदान द्यावे, असे आवाहन चंदगड पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!