
केंचापूर गल्लीत दीपावली निमित्त संगीत भजन स्पर्धा
खानापूर: राजू कुंभार
दिवाळी सणानिमित्त जय भवानी युवक मंडळ, केंचापूर गल्ली, खानापूर यांच्या वतीने विशेष संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा महिला गटासाठी (तालुका मर्यादित) आणि पुरुष गटासाठी (खुला गट) शनिवार दिनांक १४ आणि रविवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.
स्पर्धेचे आयोजन चव्हाटा देवस्थान समोर, केंचापूर गल्ली, खानापूर येथे करण्यात आले आहे. या भजन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला व पुरुष भजनी मंडळांसाठी आकर्षक रोख बक्षिसे आणि चषक ठेवण्यात आले आहेत:
पुरुष गटासाठी बक्षिसे:
पहिले बक्षीस: २५,००१ रु. व चषक
दुसरे बक्षीस: १८,००१ रु. व चषक
* तिसरे बक्षीस: १५,००१ रु. व चषक
* चौथे बक्षीस: १२,००१ रु. व चषक
* तसेच ५ वे ते ११ वे बक्षीस अनुक्रमे १०,००१ ते २,१०१ रुपयांपर्यंत व चषक दिले जाणार आहेत.
महिला गटासाठी बक्षिसे:
पहिले बक्षीस: ८,८८८ रु. व चषक
दुसरे बक्षीस: ६,६६६ रु. व चषक
तिसरे बक्षीस: ४,४४४ रु. व चषक
चौथे बक्षीस: ३,३३३ रु. व चषक
पाचवे बक्षीस: २,२२२ रु. व चषक
या स्पर्धेसाठी काही नियम व अटी लागू असणार असून, जास्तीत जास्त भजनी मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जय भवानी युवक मंडळाच्या वतीनेकरण्यात आले आहे.
संपर्क:7795310047, 9164975282, 7353493221
Advertise


