
गोवा शिपयार्डमध्ये १३१ जागांसाठी भरती; २२नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी
खानापूर: राजू कुंभार
गोवा शिपयार्ड लिमिटेडने (GSL) विविध पदांच्या एकूण १३१ जागांसाठी भरती जाहीर केली आहे. सरकारी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी असून, यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. नोकरीचे ठिकाण गोवा असणार आहे.
पदांचा तपशील व प्रवर्ग:
या भरती मोहिमेत एकूण १३१ जागांसाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत:
एक्झिक्युटिव्ह प्रवर्ग: ४० जागा
नॉन-एक्झिक्युटिव्ह प्रवर्ग: ९१ जागा
पात्रतेचे निकष आणि वयोमर्यादा:
एक्झिक्युटिव्ह पदे: या पदांसाठी उमेदवारांकडे इंजिनिअरिंग पदवी, एमबीए, सीए किंवा एलएलबीसह संबंधित क्षेत्रात ४ ते २३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच वयोमर्यादा ३३ ते ५४ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
नॉन-एक्झिक्युटिव्ह पदे: या पदांसाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा, आयटीआय, पदवी किंवा बीएससी नर्सिंगसह २ वर्षांचा अनुभव मागितला असून, वयोमर्यादा ३३ ते ४१ वर्षे आहे.
सरकारी नियमांनुसार एससी/एसटी उमेदवारांना ५ वर्षे आणि ओबीसी उमेदवारांना ३ वर्षांची वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क:
एक्झिक्युटिव्ह पदे: जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी ५०० रुपये. नॉन-एक्झिक्युटिव्ह पदे: २०० रुपये.
एससी, एसटी, पीडब्लूडी आणि माजी सैनिकांना अर्ज शुल्कात पूर्ण सूट देण्यात आली असून, अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०२६ ही आहे. इच्छुक उमेदवारांनी विहित मुदतीत गोवा शिपयार्डच्या goashipyard.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थ ळाला भेट द्यावी.
Advertise


