चंदगडमध्ये श्रीराम समर्थ गृहतारण सहकारी संस्थेचा शुभारंभ


मान्यवरांकडून संस्थेच्या उज्ज्वल वाटचालीस शुभेच्छा; सभासदांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचा संस्थेचा संकल्प

उपसंपादक: श्री स्वप्निल कुंभार. (चंदगड, आजरा, गडहिंग्लज)

श्रीराम समर्थ गृहतारण सहकारी संस्था मर्या, चंदगड या नवीन संस्थेचा शुभारंभ शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता उत्साहात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवस्मारक शेजारी, रवळनाथ गल्ली, चंदगड येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन श्री रवळनाथ पतसंस्था, चंदगडचे चेअरमन मा. श्री. सदानंद गोपाळ आवटे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. सुजय कुमार येजरे (सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था), मा. श्री. सुनील सुभाष काणेकर (नगराध्यक्ष, चंदगड), मा. श्री. शांताराम य. भिंगुडे (मॅनेजर, श्री रवळनाथ पतसंस्था, चंदगड) तसेच मा. श्री. शांताराम य. हजगुळकर (मॅनेजर, मराठा पतसंस्था, चंदगड),श्री बाबुराव हळदणकर, तसेच अन्य अतिथी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन मा. श्री. बाळकृष्ण निवृत्ती लोहार यांनी भूषविले. त्यांनी कार्यक्रमावेळी उपस्थित सर्व अतिथी न नागरिकांचे आभार मानले.

यावेळी संस्थेच्या संचालक मंडळातील श्री. प्रशांत गणपती वाडकर, श्री. संतोष मोहन जुवेकर, श्री. अभिषेक अनंत लोहार, श्री. प्रतिक विलास पाटील, श्री. संदेश तुकाराम गावडे, श्री. औदुंबर सदाशिव मोरे, श्री. बाळू बडकू उसुलकर, श्री. सागर मोहन जाधव, श्री. सौरभ संजय जुवेकर, श्री. सागर गजानन नांदोडकर तसेच सौ. मिनाक्षी बाळू कांबळे, सौ. सरस्वती गजानन नाईक आणि सौ. राधिका बाळकृष्ण लोहार यांची उपस्थिती होती. संस्थेचे व्यवस्थापक श्री. मनोज बाळू कांबळे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात योगदान दिले.

नवीन संस्थेच्या माध्यमातून सभासद व नागरिकांना सहकाराच्या माध्यमातून विविध आर्थिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी श्रीराम समर्थ गृहतारण सहकारी संस्था मर्या., चंदगडच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत संस्था सभासदांच्या विश्वासास पात्र ठरून प्रगतीची नवी शिखरे गाठो, अशी सदिच्छा व्यक्त केली.


106
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!