उद्यापासून सलग चार दिवस बँका बंद


उद्यापासून सलग चार दिवस बँका बंद

खानापूर: राजू कुंभार

उद्या, शुक्रवार दि. 11 सप्टेंबर  पासून सलग चार दिवस बँकांचे कामकाज ठप्प होणार आहे. त्यामुळे ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर नागरिकांची आर्थिक कोंडी होणार आहे. त्यासाठी आजपासूनच UPI सारख्या साधनांचा वापार करणे योग्य ठरेल.

विवीध मागण्यांसाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी उद्या संपाची हाक दिली आहे. त्यानंतर लगेचच दुसरा शनिवार, रविवार आणि गणेश चतुर्थीची सुट्टी येत असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होण्याची चिन्हे आहेत.

बँक सुट्ट्यांचे वेळापत्रक:

11 सप्टेंबर (शुक्रवार): राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी उद्या संप पुकारला आहे.

12 सप्टेंबर (शनिवार): महिन्याचा दुसरा शनिवार (बँक सुट्टी)

13 सप्टेंबर (रविवार): साप्ताहिक सुट्टी

14 सप्टेंबर (सोमवार): गणेश चतुर्थी (सार्वजनिक सुट्टी)

संप आणि लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांमुळे एटीएम (ATM) मधील रोख रक्कम संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पैशांची सोय आधीच करून ठेवावी आणि डिजिटल बँकिंगचा वापर करावा.


102
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!