आंबोली-आजरा रोडवर १६ ग्रॅम एमडी ड्रग्ससह दोघांना अटक 


आंबोली-आजरा रोडवर १६ ग्रॅम एमडी ड्रग्ससह दोघांना अटक 

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

चंदगड: स्वप्नील कुंभार

आंबोली-आजरा रस्त्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (LCB) सापळा रचून धाडसी कारवाई करत दोघांना अमली पदार्थांसह अटक केली आहे. या कारवाईत आरोपींकडून १६ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हे अमली औषध जप्त करण्यात आले आहे.

पोलीस पथकाने कारवाईदरम्यान केवळ अमली पदार्थच नाही, तर तस्करीसाठी वापरली जाणारी दुचाकी आणि दोन मोबाईल फोन असा एकूण १ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

कारवाईसाठी पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले होते. 7 सप्टेंबर रोजी पथकातील पोलीस अंमलदार समीर कांबळे आणि योगेश गोसावी यांना त्यांच्या बातमीदारांतर्फे आंबोली आजरा मार्गावर सुझुकी एक्सेस मोटरसायकलवरून दोन इसम अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने आजरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्यासह आंबोली आजरा मार्गावर सापळा रचला.यावेळी अनवर असलम शेख (वय 34 )राहणार सरनाईक वसाहत जवाहर नगर कोल्हापूर आणि किरण गडाप्पा माने (वय 33)राहणार शिवाजी पार्क कोल्हापूर यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्या ताब्यातून 16 ग्रॅम मेफो ड्रोन एमडी दोन मोबाईल हँडसेट आणि दुचाकी असा एकूण 58 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जप्त करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधवपोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह पोलीस अंमलदार राजू कोरे, शुभम संकपाळ, योगेश गोसावी, समीर कांबळे, सतीश जंगम, संजय घुंबे, अमित यानी या कारवाईत भागघेतला.

 


108
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!