काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील यांचे बंधू काळाच्या पडद्या आड.
चंदगड प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.
चंदगड तालुक्यातील शिवणगे येथील प्रगतीशील शेतकरी शंकरराव मोतीराम पाटील (वय ९१) यांचे वृद्धापकाळाने रविवारी (दि. २५) निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने शिवणगे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शंकरराव पाटील यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते चंदगड येथील पाटील हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक पाटील, तसेच अभियंता दयानंद पाटील आणि उत्तम पाटील यांचे वडील होते.
याशिवाय, राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य व दौलत साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील यांचे ते बंधू होत. तसेच निट्टूर येथील राज्य परिवहन महामंडळाचे निवृत्त अधिकारी देवेंद्र साळुंखे यांचे ते सासरे होते. प्रगतीशील शेतकरी म्हणून त्यांचा सामाजिक व कृषी क्षेत्रात परिचित असा मोठा संपर्क होता.
Views: 202

